Total Pageviews

Wednesday, 31 December 2025

CounteringThe Threat of Digital Tradecraft in Terrorism

 

The Threat of Digital Tradecraft in Terrorism

Introduction

The recent car explosion near Delhi's Red Fort on November 10, which tragically resulted in at least 15 deaths and over 30 injuries, underscores the critical role of advanced digital tradecraft in modern terrorism. This incident is a stark reminder that the frontier in counter-terrorism extends beyond physical domains into encrypted digital spaces that are often hidden from view.

The Incident: A Closer Look

On November 10, a devastating car explosion occurred near Gate No. 1 of the Red Fort Metro Station, marking one of the deadliest terror events in Delhi's recent history. Indian authorities promptly recognized the nature of the incident as a terrorist attack, entrusting the National Investigation Agency (NIA) with the investigation under counter-terrorism laws. Central to the inquiry are three doctors allegedly connected to the attack: Dr. Umar Un Nabi, Dr. Muzammil Ganaie, and Dr. Shaheen Shahid, all affiliated with Al Falah University in Faridabad. Investigators claim these individuals played a significant role in the attack's operational planning.

Major Findings from the Investigation

Encrypted Communication Networks

A particularly alarming aspect of the investigation is the use of encrypted communications. The suspects reportedly communicated via Threema, a Swiss messaging app known for its robust privacy features. Unlike traditional messaging platforms, Threema does not require users to register with personal information; instead, it assigns them a random user ID. Investigators suspect the trio established a private Threema server, creating an isolated network for sharing sensitive documents and communications. The app's end-to-end encryption, lack of metadata storage, and message deletion capabilities complicate forensic analysis, making it challenging for authorities to trace their interactions.

Innovative Communication Tactics

The suspects employed a “dead-drop” email technique reminiscent of espionage tactics. They used a shared email account to create unsent drafts, allowing members to read and update messages without leaving conventional email records. This method significantly minimizes digital footprints, making it harder for investigators to track communication.

Reconnaissance and Preparations

Records and forensic evidence indicate that the accused conducted several reconnaissance missions in Delhi prior to the attack. Investigators allege that they stockpiled ammonium nitrate, a potent explosive, potentially using a red EcoSport vehicle, which has since been seized. The choice of a commonplace vehicle likely helped them remain undetected during logistical preparations.

Operational Security and External Connections

Sources reveal that Dr. Umar, identified as the driver of the car involved in the explosion, allegedly “switched off his phones” and severed digital connections following the arrest of associates. This tactic reflects a sophisticated understanding of operational security. Furthermore, ongoing investigations suggest potential ties to the terrorist organization Jaish-e Mohammed (JeM), indicating that the attack may be part of a larger, organized network rather than the action of a solitary cell.

Academic Perspectives on Digital Terrorism

The methodologies illustrated in this incident are consistent with patterns identified in counter-terrorism research. Scholars have long cautioned that extremist groups are increasingly leveraging end-to-end encrypted (E2EE) tools for planning and coordination. Apps like Threema, which limit metadata retention, present formidable challenges for surveillance efforts. By utilizing private servers, these actors circumvent centralized infrastructures, evading detection by law enforcement. The adoption of unsent email drafts demonstrates a blend of traditional espionage techniques and modern digital strategies, emphasizing a multi-layered approach to operational security.

Implications for Counter-Terrorism Efforts

The ascent of privacy-preserving technologies among terrorist groups necessitates a reassessment of traditional surveillance methods, which have become less effective against sophisticated adversaries. Though Threema is reportedly banned in India, the suspects appeared to circumvent this prohibition by utilizing VPNs and foreign proxies, highlighting that simple bans may not suffice against determined operators.

Moving forward, investigators require advanced skill sets, including the ability to track private servers and reverse-engineer encrypted networks. Standard device seizures may no longer be adequate without specialized technical capabilities. Moreover, if links to external handlers, such as JeM, are confirmed, this attack might indicate a broader, more interconnected threat landscape than previously understood. The level of planning and discipline exhibited by the perpetrators suggests the involvement of a well-trained, possibly transnational, network rather than isolated individuals.

Shrinking Doors: The Impact of Global Migration Restrictions on India By Uday Kumar Varma

 Former Secretary, Information and Broadcasting, Government of India

The Visa Crisis: A Sudden Barrier

The world’s most sought-after work visa has become suddenly elusive. An unprecedented breakdown at U.S. consulates across India has delayed H-1B interview appointments—critical lifelines for countless Indian tech professionals—by several months. This disruption has left careers, salaries, research projects, and family plans suspended in limbo. It occurs at a particularly challenging time, as the U.S. has sharply raised H-1B fees while wealthy nations worldwide tighten migration rules simultaneously. India, the largest supplier of global talent, feels this shock more acutely than any other country.

A Larger Shift in Migration Policies

The immediate crisis occurs in the context of a significant global shift in migration policy. As noted by The Economist, rich nations have synchronized tightening measures for migration pathways. The United States has substantially increased costs, requiring new H-1B applicants to pay an upfront fee of $100,000, amid broader fee hikes and anti-fraud surcharges. In contrast, the UK has reduced its post-study work visa from two years to 18 months, while Canada has placed caps on foreign student intakes. These changes are already reshaping global mobility, with the OECD reporting a 20% decline in long-term work migration to wealthy countries in 2024, alongside a 13% drop in student mobility.

Consequences for Indian Talent

For India, these developments have profound implications. The country provides 70% of all H-1B applicants and accounts for around 30% of international students in the U.S., 25% in the U.K., and nearly 40% in Canada. Presently, 1.8 million Indian students are studying abroad, making them the largest mobile student cohort worldwide. However, recent figures show a roughly 25% decline in Indians heading to the “big four” English-speaking countries—the U.S., U.K., Canada, and Australia—reversing the post-pandemic surge.

The Breakdown at U.S. Consulates

The U.S. Department of State attributes the unexpected consular disruptions to a new rule requiring an “online presence review” for all H-1B and H-4 applicants starting mid-December. This additional scrutiny has drastically reduced daily processing capacity at consulates, causing appointments scheduled for December to be pushed back to March, April, and even mid-2026. For many affected applicants, these delays have severe consequences. Trips to India for stamping, particularly timed around the holiday season, have become complicated. Canceled flights and delayed onboarding add to the uncertainty for families, especially dependents relying on H-4 visa work authorization.

Personal and Professional Turmoil

The stories of visa applicants highlight a common theme: disrupted holidays, extended unpaid leave, and children unable to return to U.S. schools. Financial pressures are mounting as total H-1B application costs can reach tens of thousands of dollars when accounting for employer filings and attorney fees. For U.S. employers, particularly in the tech industry, these delays present operational challenges, forcing companies to slow project timelines or reallocate work temporarily. For sectors relying on Indian engineers and data scientists, this visa backlog poses not just logistical issues but potential competitive disadvantages.

A Perfect Storm of Structural Bottlenecks

Immigration experts attribute this disruption to a convergence of factors, including the new digital vetting requirement, reduced availability of interview waivers, and consular capacity that has not matched the soaring demand for visas from India. This global tightening of migration pathways further complicates matters, exerting pressure on specific visa categories, notably the H-1B, and deepening the crisis. Together, these elements have created a significant bottleneck.

Potential Ripple Effects for India

Interestingly, the ongoing crisis may produce counterintuitive long-term effects. As uncertainty rises abroad, skilled professionals in India might reconsider migrating, leading to a form of "brain retention." This shift could benefit domestic startups and IT services, bolstering India's innovation ecosystem. However, while this may strengthen India's tech landscape, it also risks reducing remittance flows and limiting the global exposure that has historically fueled India's professional mobility.

Strategic Challenges for the U.S.

For the United States, the backlog poses strategic challenges. The American tech and research sectors have thrived on a consistent influx of Indian talent. A slowdown in this pipeline may hinder access to vital skills in AI, computing, engineering, and healthcare, thereby diminishing the U.S.’s competitive edge against countries with more efficient visa processes. It could also encourage companies to relocate operations overseas or invest more heavily in automation, further straining U.S.–India relations and people-to-people ties.

A Pivotal Moment in Global Talent Flows

The December 2025 visa delays signify more than just a seasonal disruption; they represent a pivotal moment in global migration policy, highlighting India and the United States at the epicenter of this evolving landscape. Currently, thousands of applicants await with their lives, careers, and families on hold, as policies and geopolitics redefine opportunities across continents.

The question remains: can the U.S. maintain its status as the world’s premier destination for talent? Resolving such crises while balancing security with openness will be crucial in a rapidly changing world. As history unfolds, thousands of Indian professionals are left in crowded airports and temporary accommodations, clinging to job offers and dreams as the most powerful immigration system determines their futures

Monday, 29 December 2025

ऑपरेशन सिंदूर,पाकिस्तान चीनबरोबर भारतीयांचे दीर्घकालीन युद्ध,बदलता भारत संयमातून सडेतोड उत्तराकडे -ब्रिगेडियर हेमंत महाजन युद्ध सेवा मेडल-हे पुस्तक ॲमेझॉन वरती उपलब्ध आहे. https://www.amazon.in/dp/B0G8JYW8CG

 हे पुस्तक ॲमेझॉन वरती उपलब्ध आहे. https://www.amazon.in/dp/B0G8JYW8CG


परीक्षण-लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे, पीव्हीएसएम , एव्हीएसएम , एसएम,

 

या पुस्तकाचे प्रकाशन पुणे पुस्तक महोत्सवामध्ये 18 डिसेंबरला पुणे येथे झाले.

ब्रिगेडियर हेमंत महाजन ,युद्ध सेवा मेडल, लिखित “पाचवे भारत–पाकिस्तान युद्ध – ऑपरेशन सिंदूर” हे पुस्तक भारतीय राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि धोरणात्मक अभ्यासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. हे पुस्तक फक्त एका लष्करी कारवाईचे वर्णन नाही; तर ते भारताच्या बदलत्या धोरणात्मक विचारसरणीचे, सडेतोड परराष्ट्र धोरणाचे आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या लष्करी क्षमतेचे प्रभावी चित्रण करते.

हे पुस्तक आजच्या भारताच्या सुरक्षा आणि संरक्षण धोरणांवरील एक अत्यंत महत्त्वाचा आणि अभ्यासपूर्ण ग्रंथ आहे. 'पाचवे भारत पाकिस्तान युद्ध-ऑपरेशन सिंदूर, बदलता भारत - संयमातून सडेतोड उत्तराकडे' अशी या पुस्तकाची उपशीर्षक आहे, जी भारताच्या बदलत्या आणि अधिक आक्रमक (Aggressive) भूमिकेचे स्पष्ट संकेत देते.

लेखक स्वतः एक अनुभवी सैनिक आणि धोरण विश्लेषक असल्यामुळे, त्यांच्या लेखणीतून आलेले प्रत्येक निरीक्षण वस्तुनिष्ठ, व्यावसायिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रगल्भ आहे.

 

लेखनशैली आणि रचना

हे पुस्तक अत्यंत सुबोध आणि स्पष्ट शैलीत लिहिलेले आहे. प्रत्येक प्रकरण भारताच्या एका विशिष्ट धोरणात्मक पैलूवर सखोल विश्लेषण करते. पुस्तकाची रचना लष्करी ऑपरेशनच्या कालक्रमानुसार असून, सुरुवातीला जम्मू–काश्मीरमधील आव्हाने आणि पार्श्वभूमी मांडली जाते, तर शेवटच्या प्रकरणांत ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचे आंतरराष्ट्रीय परिणाम आणि भविष्यातील आव्हाने यांचे विवेचन आहे.

ब्रिगेडियर महाजन यांनी शुद्ध सैनिकी तपशीलांसोबतच राजनैतिक, आर्थिक, माहिती आणि सायबर आयामांचाही प्रभावी समावेश केला आहे, ज्यामुळे पुस्तक एक “मल्टी–डोमेन वॉर डॉसियर” बनते.

 

मुख्य मुद्द्यांचे विश्लेषण

प्रकरण 1 – जम्मू-काश्मीर : पार्श्वभूमी आणि आव्हाने

या प्रकरणात लेखकाने दहशतवाद, धार्मिक कट्टरता, आणि सीमापार घुसखोरी या समस्या ज्या प्रकारे जम्मू–काश्मीरमध्ये मूळ धरतात, त्याचे स्पष्ट विश्लेषण केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’पूर्वीच्या वातावरणाचे वास्तवदर्शी चित्रण वाचकाला संघर्षाच्या मुळाशी घेऊन जाते.

प्रकरण 2 – पहलगाम हत्याकांड : भारतीय प्रतिसादाची गरज

हिंदू यात्रेकरूंवर झालेल्या क्रूर हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या घटनेला भावनिक व राष्ट्रीय सन्मानाचा विषय बनवून भारताने निर्णायक प्रत्युत्तर देण्याची गरज निर्माण झाली — हाच ‘ऑपरेशन सिंदूर’चा आरंभबिंदू ठरला.

प्रकरण 3 आणि 4 – बहुआयामी युद्धनीती आणि निर्णायक टप्पा

लेखकाने भारताने पाकिस्तानविरुद्ध स्वीकारलेली मल्टी-डोमेन स्ट्रॅटेजी सविस्तरपणे उलगडली आहे — सायबर, माहिती, स्पेस, आणि लष्करी क्षेत्रांचा एकत्रित वापर करून केलेले हे अभियान अत्यंत संगठित आणि रणनीतिक आहे.
पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्यांना निष्फळ ठरवून भारताने युद्धभूमीवर पुन्हा आक्रमक पवित्रा घेतल्याचे वर्णन या प्रकरणांत प्रभावीपणे मांडले आहे.

प्रकरण 5 – पंतप्रधान मोदींचे नेतृत्व

हे प्रकरण पुस्तकाचे आत्मा म्हणावे लागेल. लेखकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाम नेतृत्वाचे आणि निर्णयक्षमतेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले आहे. त्यांनी दिलेली ऑपरेशनल फ्रीडम आणि राजकीय पाठबळ हे विजयाचे प्रमुख घटक असल्याचे अधोरेखित केले आहे.

प्रकरण 6 आणि 7 – भारतीय सैन्याचे शौर्य आणि तिन्ही दलांची समन्वय भूमिका

‘4 पॅरा स्पेशल फोर्सेस’च्या साहसी कारवायांचे वर्णन रोमांचकारी आहे. हवाई दल आणि नौदलाने पाकिस्तानची कोंडी करून शत्रूला संरक्षणात्मक पवित्र्यात ढकलले — हा भारताच्या तिन्ही दलांतील समन्वयाचा अत्यंत प्रेरणादायी नमुना आहे.

प्रकरण 8 – सायबर, माहिती आणि अंतराळ युद्ध

लेखकाने या भागात युद्धाच्या नव्या सीमांचा उत्कृष्ट विश्लेषण केले आहे. सायबर हल्ले, माहितीप्रवाहाचे नियंत्रण आणि सॅटेलाइट इंटेलिजन्स या सर्व क्षेत्रांत भारताने साधलेले तांत्रिक प्रभुत्व पुस्तकात सविस्तर मांडले आहे.

प्रकरण 9 – सिंधू पाणी कराराचा फेरविचार

हे प्रकरण विशेष लक्षवेधी आहे. पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षात आर्थिक आणि जलनीतीचा कसा वापर करता येतो, यावर लेखकाने अत्यंत धाडसी व व्यावहारिक विचार मांडले आहेत.

प्रकरण 10 – आत्मनिर्भर भारताचे शस्त्रसामर्थ्य

स्वदेशी तंत्रज्ञान, ड्रोन, ब्रह्मोस, आकाश-तीर आणि ‘त्रिनेत्र’ सारख्या सिस्टीम्समुळे भारताने साधलेली आत्मनिर्भरता हे राष्ट्राच्या नव्या आत्मविश्वासाचे द्योतक आहे.

प्रकरण 11 ते 13 – भविष्यातील धोके आणि प्रादेशिक असंतोष

लेखकाने पाकिस्तानमधील बलुचिस्तान–सिंधमधील अस्थिरता, अफगाण सीमा प्रश्न आणि देशातील हेरगिरीच्या आव्हानांवर सखोल भाष्य केले आहे. ‘ज्योती मल्होत्रा प्रकरण’ या माध्यमातून अंतर्गत सुरक्षा आणि माहिती युद्धाचे नवे पैलू उजागर केले आहेत.

प्रकरण 14 ते 16 – चीन–पाक अक्ष आणि आंतरराष्ट्रीय समीकरणे

चीनच्या अप्रत्यक्ष युद्धनीती, अमेरिका–भारत संबंधांचे नवीन समीकरण, आणि जागतिक प्रतिक्रिया यांचे बारकाईने विश्लेषण या भागात आहे. भारताचे खरे मित्र कोण आणि विरोधक कोण — याचे वास्तवदर्शी चित्रण पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

प्रकरण 17 – बांगलादेश अस्थिरता आणि भारताची धोरणात्मक संधी

बांगलादेशातील बदलत्या राजकीय समीकरणांचा भारतावर होणारा परिणाम आणि घुसखोरी कमी करण्याची संधी या दृष्टिकोनातून लेखकाने धोरणात्मक सूचना दिल्या आहेत.

 

लेखकाची दृष्टी आणि विचारांची खोली

ब्रिगेडियर महाजन यांचे लेखन फक्त लष्करी विश्लेषण नाही; ते एक राष्ट्रीय दृष्टिकोन आहे. त्यांच्या लेखणीतून दिसते की भारत आता संयमातून बाहेर पडून निर्णायक उत्तर देणारे राष्ट्र बनले आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात “बदलता भारत” या संकल्पनेचा ठसा जाणवतो.

 

पुस्तकाचे विशेष गुण

  • युद्ध, कूटनीती आणि माहिती युद्ध या तिन्ही क्षेत्रांचा एकत्रित अभ्यास.
  • अतिशय प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ मांडणी.
  • राष्ट्रीय सुरक्षेबद्दल जनजागृती निर्माण करणारी भाषा.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या भारताचे स्पष्ट प्रतिबिंब.
  • भावनिक आणि रणनीतिक दृष्टिकोनाचा संतुलित संगम.

 

निष्कर्ष

– ऑपरेशन सिंदूर” हे पुस्तक केवळ लष्करी साहित्य नाही, तर भारताच्या आत्मविश्वास, स्वाभिमान आणि नव्या धोरणात्मक शक्तीचे दस्तावेज आहे. प्रत्येक प्रकरण वाचताना वाचकाला जाणवते की भारत आता भीक मागणारा नव्हे, तर प्रत्युत्तर देणारा राष्ट्र म्हणून उभा आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी अत्यंत सोप्या आणि परिणामकारक मराठी भाषेत हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात विषयाची सखोल माहिती, स्पष्टीकरण आणि भारताच्या संरक्षण धोरणांमधील महत्त्वाचे बदल अतिशय प्रभावीपणे मांडले आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' हे केवळ पुस्तक नसून, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणांवर चर्चा करणारा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. हे पुस्तक खूप चांगले आहे आणि राष्ट्रीय सुरक्षा, सैन्य, आंतरराष्ट्रीय संबंध आणि धोरण (Strategy) या विषयांमध्ये रुची असणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि संग्राह्य आहे.

हे पुस्तक प्रत्येक देशभक्त भारतीयाने, विशेषतः विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी आणि सुरक्षा अभ्यासकांनी वाचलेच पाहिजे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी अत्यंत जबाबदारीने, राष्ट्राभिमानाने आणि व्यावसायिक परिपक्वतेने हे लेखन केल्यामुळे हे पुस्तक भारतीय धोरणात्मक साहित्याचे एक मोलाचे शिल्प ठरते.

 

सारांश:
 विषय महत्त्वाचा — भारताचे बदलते युद्धनीती व धोरणात्मक भविष्य
 लेखनशैली — स्पष्ट, प्रवाही आणि माहितीपूर्ण
अभ्यासकांसाठी — अनिवार्य वाचन


२०२५ मध्ये $१३५ अब्ज FDI वचनबद्धता: येणाऱ्या काळात FDI आणखी वाढवण्यासाठी अनेक धोरणात्मक पाऊले उचलणे आवश्यक

 


२०२५ मोठे FDI घोषणांचे वर्ष

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांपासून ते चिप उत्पादक, ऑटो कंपन्या, वित्तीय सेवा संस्था आणि ऊर्जा क्षेत्रातील खेळाडूंपर्यंतच्या परदेशी कंपन्यांनी २०२५ मध्ये आतापर्यंत भारतात किमान $१३५ अब्ज (अब्ज च्या गुंतवणुकीची तयारी केली आहे. यापैकी काही गुंतवणूक आधीच सुरू झाली आहे आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्ससारख्या विभागांमधील गुंतवणूक काही महिन्यांत पूर्ण होईल, परंतु या गुंतवणुकीला मूर्त रूप घेण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागल्यास, वार्षिक अतिरिक्त $२७ अब्ज ची विदेशी थेट गुंतवणूक होईलजी गेल्या वर्षीच्या $८१ अब्जच्या एकूण आवकपैकी सुमारे एक तृतीयांश आहे. एप्रिल-सप्टेंबरमध्ये FDI आवक १६% वाढून $५०. अब्ज झाली आहे, ज्यामध्ये इक्विटी आणि पुनर्निवेशित कमाईचा समावेश आहे, यामुळे आशा आहे की चालू आर्थिक वर्षात एकूण आवक प्रथमच $१००-अब्जचा टप्पा ओलांडेल. आणि, अलीकडेच टेक दिग्गज गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉनने केलेल्या मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणांमुळे त्यांचा आशावाद आणखी वाढला आहे, ज्यामध्ये एकूण गुंतवणुकीची वचनबद्धता $७० अब्जाहून अधिक आहे. याव्यतिरिक्त, फॉक्सकॉन, विनफास्ट आणि शेल एनर्जी सारख्या कंपन्यांकडून $६५ अब्जाहून अधिक एकत्रित गुंतवणुकीचे आणखी ७५०-८०० गुंतवणूक प्रस्ताव आहेत .

मोठी FDI आवक निश्चितपणे हा कल उलटण्यास मदत करेल. अधिक एकूण FDI आवकची गरज आहे, आणि त्यावरच सरकारी लक्ष केंद्रित केले जात आहे,”

गुंतवणुकीचा मोठा हिस्सा टेक क्षेत्रात येत आहे, ज्यात सेमीकंडक्टरसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये आकर्षण दिसत आहे. परंतु, ऑटोमोबाईलसारखे काही क्षेत्र आहेत जिथे फोर्ड आणि जीएम सारख्या अनेक मोठ्या जागतिक कंपन्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आता EV  क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आशा आहे की विनफास्टनंतर टेस्ला  सारख्या कंपन्या देखील देशात कारखाना उभारतील, मात्र अनेक चिनी कंपन्या या भारतात  इन्व्हेस्टमेंट करण्याकरता उत्सुक आहे खास तर चिनी इलेक्ट्रिकल व्हीकल्सच्याच्या कंपन्या त्यांना सरकारने थोडे दूरच ठेवलेले आहे, कारण चीन अत्यंत लबाड देश आहे आणि भारतात राहून काहीतरी इतर उलटी सुट्टी कामे करतील अशी नेहमीच भीती असते.

FDI वाढवण्यासाठी धोरणात्मक पाऊले

येणाऱ्या काळात परदेशातून येणारी विदेशी थेट गुंतवणूक  आणखी वाढवण्यासाठी भारताने अनेक स्तरांवर धोरणात्मक आणि लक्ष्यित पाऊले उचलणे आवश्यक आहे.

संपर्क साधायचे प्रमुख देश

भारताने सध्याच्या मुख्य भागीदारांसोबत संबंध अधिक मजबूत करतानाच, नवीन आणि उदयोन्मुख) बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

भौगोलिक गट

प्रमुख देश

FDI वाढवण्याचे कारण

पारंपरिक भागीदार

अमेरिका, जपान, सिंगापूर, यूके,  नेदरलँड्स

हे देश आधीपासूनच मोठे गुंतवणूकदार आहेत. तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा आणि वित्तीय सेवांमध्ये अधिक भागीदारीसाठी संपर्क साधावा.

तंत्रज्ञान उत्पादन

 दक्षिण कोरिया, जर्मनी, तैवान

उत्पादन ,सेमीकंडक्टर्स (chips), ऑटोमोबाईल आणि प्रगत अभियांत्रिकीमध्ये (advanced engineering) गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी.

ऊर्जा आणि पायाभूत सुविधा

संयुक्त अरब अमिरात (UAE), सौदी अरेबिया, फ्रान्स, 🇦🇺 ऑस्ट्रेलिया

ऊर्जा संक्रमण ,अक्षय ऊर्जा ,बंदरे (Ports), रस्ते आणि लॉजिस्टिक्समध्ये मोठी भांडवली गुंतवणूक आकर्षित करणे.

आसियान (ASEAN) देश

 व्हिएतनाम,  इंडोनेशिया, थायलंड

पुरवठा साखळीतील विविधता आणि आशियाई क्षेत्रीय व्यापारासाठी भारताला उत्पादन केंद्र  बनवण्यासाठी.


लक्ष्य साधायच्या प्रमुख कंपन्या आणि क्षेत्रे

भारताने केवळ सरकारी स्तरावर नव्हे, तर थेट कॉर्पोरेट स्तरावर संपर्क साधून 'Make in India' आणि 'Atmanirbhar Bharat' धोरणांशी जुळणाऱ्या कंपन्यांना आकर्षित करावे.

लक्ष्य क्षेत्र (Sector)

प्रमुख कंपन्या/उपक्रम

FDI वाढवण्याचे उद्दिष्ट

सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स

TSMC, Samsung Electronics, Intel, Micron, Foxconn

संपूर्ण पुरवठा साखळी भारतात आणणे, डिझाइन आणि उत्पादन केंद्रे उभारणे.

इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि ऑटोमोबाईल

Tesla, BYD, BMW, Hyundai, Vinfast

EV उत्पादन, बॅटरी तंत्रज्ञान आणि EV चार्जिंग पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक.

ग्रीन एनर्जी आणि हायड्रोजन

TotalEnergies, Shell Energy, Adani Green/Reliance (भागीदारी)

मोठ्या प्रमाणात सौर (Solar), पवन (Wind) ऊर्जा प्रकल्प आणि ग्रीन हायड्रोजन उत्पादन युनिट्स.

डेटा सेंटर्स आणि क्लाऊड सेवा

Amazon Web Services (AWS), Google Cloud, Microsoft Azure, Oracle

डेटा लोकलायझेशनच्या वाढत्या गरजेनुसार डेटा सेंटर्समध्ये गुंतवणूक.

जीवन विज्ञान (Life Sciences) आणि फार्मा

Pfizer, Roche, Johnson & Johnson

संशोधन आणि विकास (R&D), क्लिनिकल ट्रायल्स आणि उच्च-मूल्याच्या फार्मा उत्पादनांचे उत्पादन.


धोरणात्मक पाऊले आणि सुधारणा

FDI आकर्षित करण्यासाठी धोरणांमध्ये सातत्य, सुलभता आणि स्पर्धात्मकता असणे महत्त्वाचे आहे.

. व्यवसाय सुलभता आणि नियामक सुधारणा

एक खिडकी योजना -FDI प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य स्तरावर परवानगी मिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि वेळेच्या मर्यादेत पूर्ण करणे अनिवार्य करावे.

  • करार अंमलबजावणी -जलद आणि विश्वासार्ह व्यावसायिक विवाद निवारणासाठी  समर्पित वाणिज्यिक न्यायालये अधिक मजबूत करणे.
  • कर प्रणालीत स्थिरता: कर कायद्यांमध्ये वारंवार होणारे बदल टाळणे आणि दीर्घकालीन कर-स्थिरता धोरण  प्रदान करणे.

. पायाभूत सुविधा आणि जमीन सुधारणा

  • गती शक्ती योजनेचा विस्तार: जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक्स, बंदरे, विमानतळ आणि कनेक्टिव्हिटीवर वेगाने काम करणे, ज्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होईल.
  • औद्योगिक भू-बँक गुंतवणूकदारांना तत्काळ उपलब्ध, विवादमुक्त आणि पायाभूत सुविधांनी युक्त जमीन सहज उपलब्ध करून देणे.
  • गुंतवणूक-विशिष्ट: विशिष्ट क्षेत्रांसाठी (उदा. सेमीकंडक्टर, वैद्यकीय उपकरणे) FDI च्या गरजेनुसार 'कस्टमाइज्ड' विशेष आर्थिक क्षेत्रे (SEZ) तयार करणे.

. मनुष्यबळ विकास आणि कौशल्य

  • कुशल कामगार निर्मिती: उद्योगांच्या मागणीनुसार अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात उच्च-स्तरीय कौशल्य विकास कार्यक्रम  सुरू करणे.
  • आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य: जागतिक विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्यासाठी प्रोत्साहन देणे, ज्यामुळे R&D आणि टैलेंट पूलची गुणवत्ता सुधारेल.

. गुंतवणूक प्रोत्साहन

  • उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (PLI) योजनेचा विस्तार: युरोप आणि अमेरिकेतील कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी PLI योजनेचा लाभ नवीन उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी (उदा. स्पेसटेक, AI, रोबोटिक्स) विस्तारित करणे.
  • FDI धोरणाचे उदारीकरण : विमा, मीडिया, -कॉमर्स (ज्यामध्ये अजूनही काही निर्बंध आहेत) यांसारख्या क्षेत्रांमध्ये स्वयंचलित मार्गाने FDI मर्यादा वाढवणे.

या एकत्रित उपायांमुळे, भारत केवळ एक आकर्षक बाजारपेठ राहता, जागतिक पुरवठा साखळीतील एक विश्वासार्ह आणि स्पर्धात्मक उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयास येईल.

 

Saturday, 27 December 2025

ईशान्य भारताचा रक्षक: महापराक्रमी लचित बरफुकन

https://www.saamana.com/article-by-brigadier-hemant-mahajan-0n-lachit-borphukan/ 

ईशान्य भारताचा रक्षक: महापराक्रमी लचित बरफुकन

जेव्हा नागरिक पुस्तके वाचतात,  त्यावेळेला देश प्रगती करतो

१८ डिसेंबरला पुणे येथील पुस्तक महोत्सवात अरुण करमरकर यांच्या 'लचित बरफुकन ' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी मला मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात लचित बरफुकन यांची जन्मशताब्दी साजरी होत असल्याने, या पुस्तकात ईशान्य भारताचे शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाणार्‍या लचित फुर्को यांच्या युद्धकला आणि लढलेल्या प्रमुख लढायांचे सखोल विश्लेषण केले आहे.

प्रस्तावना

भारताच्या इतिहासात अनेक शूरवीरांनी परकीय आक्रमकांपासून मातृभूमीचे रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्याप्रमाणेच ईशान्य भारतात मुघलांच्या आक्रमक विस्तारवादाला ज्याने रोखून धरले, ते नाव म्हणजे लचित बरफुकन. मुघल सम्राट औरंगजेबाच्या अवाढव्य सैन्याला ब्रह्मपुत्रा नदीच्या लाटांवर पराभूत करून आसामचे स्वातंत्र्य अबाधित राखणाऱ्या या सेनापतीचा इतिहास अंगावर रोमांच उभा करणारा आहे.

आसामचे सुपुत्र आणि अहोम साम्राज्याचे सेनापती लचित बरफुकन हे भारतीय इतिहासातील अशा महान नायकांपैकी एक आहेत, ज्यांच्या शौर्यापुढे बलाढ्य मुघल सत्तेलाही नतमस्तक व्हावे लागले. १६७१ ची 'सराईघाटची लढाई' ही केवळ दोन सैन्यांमधील युद्ध नव्हते, तर ते आसामचे स्वातंत्र्य आणि अस्मिता टिकवण्यासाठी दिलेला एक अभूतपूर्व लढा होता.

 

ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि मुघलांचे आक्रमण

१७ व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेब संपूर्ण भारत आपल्या अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न करत होता. आसामचे अहोम साम्राज्य हे मुघलांच्या डोळ्यातील सल बनले होते. १६६३ मध्ये मुघल सेनापती मीर जुमला याने अहोमांवर विजय मिळवून काही प्रदेश आणि खंडणी लादली होती. हा अपमान अहोम राजा चक्रध्वज सिंह यांना सहन झाला नाही. त्यांनी आपला गेलेला प्रदेश परत मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आणि या मोहिमेचे नेतृत्व सोपवले गेले — लचित बरफुकन यांच्याकडे.

लचित बरफुकन यांचे नेतृत्व आणि संघटन कौशल्य

लचित बरफुकन हे केवळ एक सैनिक नव्हते, तर ते एक उत्तम रणनीतीकार होते. त्यांनी सैन्याची पुनर्रचना केली. आसामच्या भौगोलिक परिस्थितीचा (डोंगर, नद्या आणि घनदाट जंगले) विचार करून त्यांनी पायदळ आणि नौदलाला विशेष प्रशिक्षण दिले.

त्यांच्या शिस्तीचा एक प्रसिद्ध किस्सा सांगितला जातो: गुवाहाटीच्या रक्षणासाठी तटबंदी (मोमई-कटा गढ) बांधण्याचे काम सुरू असताना, त्यांचे सख्खे काका कामात हलगर्जीपणा करताना आढळले. लचित यांनी "माझ्या काकांपेक्षा माझा देश मोठा आहे" असे म्हणत तिथेच आपल्या काकांचा शिरच्छेद केला. या घटनेमुळे सैन्यात शिस्तीचा असा संदेश गेला की, संपूर्ण तटबंदी एका रात्रीत उभी राहिली.

सराईघाटची लढाई: रणनीती आणि युद्धाचे स्वरूप (१६७१)

मुघलांनी अंबरचा राजा रामसिंह (प्रथम) याच्या नेतृत्वाखाली प्रचंड सैन्य पाठवले. या सैन्यात ३०,००० पायदळ, १५,००० तिरंदाज, १८,००० घोडेस्वार आणि अफाट तोफखाना होता. याउलट अहोमांकडे संख्याबळ कमी होते.

लचित बरफुकन यांना माहित होते की उघड्या मैदानावर मुघलांच्या बलाढ्य घोडदळाशी लढणे आत्मघातकी ठरेल. म्हणून त्यांनी 'गुरिल्ला वॉरफेअर' (गनिमी कावा) आणि 'जलकुशलता' यांचा वापर करण्याचे ठरवले.

सराईघाटच्या लढाईचे रणकंदन (१६७१)

सराईघाटची लढाई ही जागतिक इतिहासातील अशा दुर्मिळ लढायांपैकी एक आहे, जिथे केवळ जिद्दीच्या जोरावर एका छोट्या सैन्याने बलाढ्य साम्राज्याला पाण्यात बुडवले.

  • रणभूमीची निवड: लचित बरफुकन यांनी अत्यंत चाणाक्षपणे ब्रह्मपुत्रा नदीच्या सर्वात अरुंद पट्ट्याची (सराईघाट) निवड केली. येथे नदीची रुंदी कमी असल्यामुळे मुघलांच्या मोठ्या नौका आणि प्रचंड तोफखाना निकामी झाला.
  • अहोमांची तटबंदी: लचित यांनी नदीच्या दोन्ही बाजूंना मातीचे आणि बांबूचे मजबूत किल्ले (गढ) उभारले होते. मुघल सेनापती रामसिंह याला जमिनीवरून आक्रमण करणे अशक्य झाल्यामुळे त्याला नाईलाजाने नौदलाचा वापर करावा लागला.
  • गनिमी कावा आणि रात्रीचे हल्ले: अहोम सैनिक रात्रीच्या वेळी मुघलांच्या छावणीत शिरून त्यांची रसद तोडत असत. लचित यांनी मुघलांना इतके थकवले की प्रत्यक्ष युद्धाआधीच त्यांचे अर्धे मनोबल खचले होते.
  • लचित यांची 'मरणोत्तर' जिद्द: युद्धाच्या मुख्य दिवशी लचित प्रचंड आजारी होते, त्यांना चालणेही कठीण होते. मुघलांचा दबाव वाढताच अहोम सैन्य मागे फिरू लागले. हे पाहून लचित यांनी स्वतःला एका नौकेत बांधून घेतले आणि ओरडले, "माझ्या देशाला संकटात सोडून मी मरू इच्छित नाही, ज्याला पळून जायचे आहे त्याने खुशाल जावे!"
  • नौदलाचा वापर: अहोमांकडे लहान पण चपळ नौका होत्या, ज्या नदीच्या पात्रात वेगाने फिरू शकत होत्या. याउलट मुघलांची मोठी जहाजे अरुंद पात्रात अडकून पडली.
  • विजयाचा थरार: आपल्या सेनापतीला मरणासन्न स्थितीतही वाघासारखे लढताना पाहून अहोम सैन्यात चैतन्य संचारले. त्यांनी मुघलांच्या 'नावारी' (Warships) वर चहुबाजूंनी हल्ला केला. चिखल, पाणी आणि अरुंद पात्रात मुघलांची दैना झाली. रामसिंहला मानहानीकारक पराभव स्वीकारून माघार घ्यावी लागली.

 

लचित बरफुकन यांची युद्धनीती ही केवळ शौर्यावर आधारित नव्हती, तर ती अत्यंत प्रगत मानसशास्त्र, भूगोल आणि गनिमी काव्याचा (Guerrilla Warfare) एक उत्तम नमुना होती.

प्रत्यक्ष रणसंग्राम आणि लचित यांचे शौर्य

युद्धाच्या अंतिम टप्प्यात लचित बरफुकन प्रचंड आजारी पडले होते. त्यांना ताप होता आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. मुघल सैन्य शिरकाव करत आहे हे पाहून अहोम सैन्य मागे हटू लागले. ही बातमी ऐकताच लचित उठले आणि आपल्या सात नौकांसह युद्धभूमीवर उतरले. त्यांनी सैनिकांना गर्जना केली:

"तुम्हाला पळून जायचे असेल तर जा, पण मी शेवटपर्यंत लढणार. राजाने मला हा देश वाचवण्याची जबाबदारी दिली आहे, मी ती पार पाडणार!"

आपल्या सेनापतीला मरणासन्न अवस्थेतही लढताना पाहून अहोम सैन्यात ऊर्जेचा संचार झाला. त्यांनी निकराचा हल्ला चढवला. ब्रह्मपुत्रा नदी रक्ताने लाल झाली. मुघलांच्या नौदलाचा चक्काचूर झाला आणि राजा रामसिंहला पराभव स्वीकारून माघार घ्यावी लागली.

युद्ध कौशल्याचे विश्लेषण

लचित बरफुकन यांच्या युद्धशैलीची काही प्रमुख वैशिष्ट्ये:

गनिमी कावा: शत्रूच्या शक्तीस्थानावर प्रहार करण्याऐवजी त्यांच्या कमकुवत दुव्यावर (उदा. नौदल) हल्ला करणे.

हेरगिरी: मुघलांच्या हालचालींची अचूक माहिती मिळवण्यासाठी त्यांनी सक्षम गुप्तहेर जाळे विणले होते.

साधनसामग्रीचा अभाव असूनही विजय: तोफा आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज मुघलांना त्यांनी केवळ बांबूचे किल्ले आणि चपळ नौकांच्या जोरावर हरवले.

लोकांचा सहभाग: हे युद्ध केवळ सैनिकांचे नव्हते, तर आसामच्या प्रत्येक नागरिकाचा त्यात सहभाग होता.

निष्कर्ष

लचित बरफुकन यांनी सराईघाटच्या लढाईत मिळवलेला विजय हा केवळ आसामचा विजय नव्हता, तर तो संपूर्ण भारताच्या अस्मितेचा विजय होता. जर त्यांनी मुघलांना तिथे रोखले नसते, तर आज ईशान्य भारताचा सांस्कृतिक आणि राजकीय नकाशा वेगळा असता.

दुर्दैवाने, विजयानंतर काही दिवसातच प्रकृती खालावल्यामुळे या महानायकाचे निधन झाले. आजही एन.डी.ए. (NDA) च्या सर्वोत्कृष्ट कॅडेटला 'लचित बरफुकन सुवर्णपदक' देऊन गौरवले जाते, जे त्यांच्या महानतेचे प्रतीक आहे. लचित बरफुकन हे "पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज" म्हणून कायम स्मरणात राहतील.

वीर लचित बरफुकन : कविता

ब्रह्मपुत्रेच्या लाटांवरती, ज्याने इतिहास लिहिला, मुघलांच्या त्या दर्पाला, मातीत ज्याने मिळविला.

काका असो वा नातेवाईक, राष्ट्रधर्म ज्याने पाळला, देशासाठी अपुल्या ज्याने, रक्ताचा सडा सांडला.

तप्त शरीरी असूनही तो, रणांगणी जो गर्जला, "शरण जाणार नाही कधी", शब्द हाच तो पुजला.

गनिमी कावा, युद्धनीती अन् शौर्याचा तो महासागर, सराईघाटच्या रणांगणी जो, ठरला शत्रूचा तो काळ.

नमन तुला हे वीर नायका, आसामचा तू प्राण, लचित तुझे हे नाव अखंड, भारताची महान शान!