Total Pageviews

Thursday, 23 February 2023

भारतीय सैन्यदलाने एका भारतीय स्टार्ट-अपला लढाऊ स्वार्म ड्रोन्सच्या निर्मितीची 124 कोटींची ऑर्डर

 

भारतीय सैन्यदलाने एका भारतीय स्टार्ट-अपला लढाऊ स्वार्म ड्रोन्सच्या निर्मितीची 124 कोटींची ऑर्डर दिली आहे. लढाऊ ड्रोन्सचे नाव येताच अमेरिकन सैन्याच्या कुख्यात प्रिडेटर ड्रोनची आठवण झाली असेल. छोट्या विमानाच्या आकाराचे प्रिडेटर ड्रोन रिमोटद्वारे उडवले जात आणि एका छोट्या लढाऊ विमानासारखे काम करते.

 

मात्र भारतीय सैन्याने अशा स्ट्राईक ड्रोनऐवजी अशा ड्रोन सिस्टिमची निवड केली आहे, ज्यांना अपारंपरिक शस्त्रांच्या जगात 'स्लॉटरबॉट' म्हटले जात आहे.

 

स्वार्म ड्रोन म्हणजेच झुंडीत सोबत उडत लक्ष्यावर बॉम्बसारखे कोसळणारे आत्मघाती ड्रोन्स. या घातक कॉम्बिनेशनमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स जोडल्यावर तुम्हाला असे घातक शस्त्र मिळते जे केवळ शेजारी उडत असलेल्या ड्रोनसोबत संपर्कच करत नाही तर स्वतः लक्ष्य ओळखून ते उध्वस्तही करते.

 

पाहा, हे स्वार्म ड्रोन्स काय आहेत, ज्यावर अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायल सातत्याने प्रयोग करत आहेत. आता भारतीय सैन्याकडे हे अमूल्य शस्त्र आल्याने आपल्या क्षमतेत वाढ होणार आहे...

 

सर्वात आधी समजून घ्या स्वार्म ड्रोन्स काय असतात

 

झुंडीने उडणाऱ्या किड्यांपासून मिळाली आयडिया... लहान आहेत, मात्र खूप घातक

 

तुम्ही 2019 मधील गेरार्ड बटलर यांचा हिट हॉलीवूड सिनेमा 'अँजल हॅज फॉलन' बघितला आहे का? या चित्रपटाच्या एका सीनमध्ये स्वार्म ड्रोन्सच्या मदतीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर हल्ला होतो आणि त्यांच्या संरक्षणातील टीम असहाय होते.

 

स्वार्म ड्रोन्सचा सिद्धांत संख्येवर आधारित आहे. याची आयडिया झुंडीत उडणारे किडे आणि पक्ष्यांना बघून आला होता.

 

पाहा, स्वार्म ड्रोन्सची खासियत काय आहे...

 

1980 च्या दशकात पहिल्यांदा बनले होते... आज 24 हून अधिक देश वापरत आहेत

 

अशा प्रकारच्या शस्त्रांवर 1980 च्या दशकात पहिल्यांदा प्रयोग करण्यात आला होता. वास्तविक, यांचे मूळ काम लढाऊ विमानांना सरफेस टू एअर मिसाईल्सपासून वाचवणे होते.

 

तेव्हा लढाऊ विमाने थांबवण्यासाठी सीमेवर SAM चे स्थायी स्टेशन असायचे. ते बॉम्बसारखे कोसळून हे स्टेशन उध्वस्त करायचे.

 

मात्र कालानुरूप SAM स्टेशन्स बनायला लागले. त्यामुळे ते उध्वस्त करण्यासाठी अशा शस्त्रांची गरज होती जे लॉन्च झाल्यावर थेट कोसळण्याऐवजी काही वेळ हवेत थांबेल आणि SAM चे लोकेशन कळल्यावरच वार करेल.

 

यासाठी पहिल्यांदा ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर या शस्त्र प्रणालीत करण्यात आला. हे ड्रोन झुंडीने उडून हवेत थांबू शकत होते. लक्ष्यानुसार यांची दिशाही बदलली जाऊ शकत होती.

 

आज जगात 24 पेक्षा जास्त देश अशा आत्मघाती शस्त्रांचा वापर करत आहेत.

 

AI बनले गेमचेंजर... यांनी स्वार्म ड्रोन्सला बनवले ऑटोनॉमस

 

स्वार्म ड्रोन्सचे तंत्रज्ञान भलेही जगातील 24 देशांकडे आहे, मात्र सर्वांकडे हे AI द्वारे संचलित करण्याचे तंत्रज्ञान नाही.

 

इस्रायल, ब्रिटन आणि अमेरिका हे मोजकेच देश आहे, ज्यांनी स्वार्म ड्रोन्स AI सोबत जोडून ते अधिक घातक बनवले.

 

आधी हे ड्रोन्स आपले सेन्सर्स आणि कॅमेऱ्याच्या मदतीने टारगेट लोकेट करतात आणि आपल्या ऑपरेटरला माहिती देतात. ऑपरेटरच्या कमांडनंतरच ते वार करतात.

 

मात्र AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हे ड्रोन्स ऑटोनॉमस बनू शकतात. म्हणजेच हे केवळ एकमेकांसोबत कम्युनिकेट करून एकदम निश्चित पॅटर्नमध्ये उडत नाही, तर लक्ष्य स्वतःच ओळखतात. त्यानुसार स्वतःच दिशा बदलतात आणि संधी मिळताच लक्ष्यही नष्ट करतात.

 

सध्या हे तंत्रज्ञान जगातील काही देशांकडेच आहे. आता भारतही या तंत्रज्ञानात पूर्णपणे आत्मनिर्भर होत आहे.

 

जाणून घ्या, भारताच्या स्वार्म ड्रोन्सची वैशिष्ट्ये

 

भारतीय सैन्याचे स्वार्म ड्रोन्स 50 किमी अंतरावरील लक्ष्यावर हल्ला करू शकते

 

भारतीय सैन्यदलाने भारतीय स्टार्टअप न्यूस्पेस रिसर्स अँड टेक्नोलॉजीला स्वार्म ड्रोन्सचे कंत्राट दिले आहे. ही कंपनी एचएएलसह याची निर्मिती करेल

 

कंपनीचे मालक समीर जोशी स्वतःही भारतीय वायुदलात अधिकारी राहिलेले आहेत. त्यांनी बनवलेले ड्रोन्स अॅडव्हान्स्ड ऑटोनॉमी, कम्प्युटिंग, कम्युनिकिशेन आणि एआय प्रोटोकॉलद्वारे एकमेकांसह को-ऑर्डिनेट करत वेगवेगळ्या मोहिमा पूर्ण करतात. यात मानवाची गरज खूप कमी असते.

 

हे स्वार्म ड्रोन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने लक्ष्य ओळखून हल्ला करू शकतात. अल्गोरिदमद्वारे त्यांना वेगवेगळ्या मोहिमांसाठी प्रोग्राम केले जाऊ शकते. मिशनदरम्यान ते कंट्रोल स्टेशनशीही कम्युनिकेट करू शकतात.

 

मीडिया रिपोर्टनुसार 100 ड्रोन्सची स्वार्म सिस्टिम 50 किमीच्या पल्ल्यातील लक्ष्य उध्वस्त करू शकते.

 

भारतीय सैन्याला ड्रोन पुरवठा करणाऱ्या न्यू स्पेस स्टार्टअपचे संस्थापक समीर जोशी सांगतात की स्वार्ममधील सर्व ड्रोन्सकडे स्वतःची बुद्धिमत्ता असते, ज्यामुळे ते एकत्रितपणे निर्णय घेऊ शकतात. ठरवून दिलेले काम ते एकमेकांत वाटून घेतात.

 

आता पाहा, आपले स्वार्म ड्रोन्स आणि अमेरिकेच्या प्रिडेटर ड्रोनमध्ये काय फरक आहे?

 

भारतच नव्हे तर जगातील मोठे देश स्वार्म ड्रोन्स सिस्टिमशी संबंधित प्रकल्पांवर काम करत आहेत. फोर्ब्स वेबसाईटवरील एका रिपोर्टनुसार, फ्रान्स Icarus प्रोजेक्ट, रशिया Lightning, स्पेन RAPAZ, ब्रिटन Blue Bear आणि दक्षिण आफ्रिका N-Raven प्रोजेक्टवर काम करत आहे.

 

भारताने या आधी ज्या परदेशी ड्रोन्सची खरेदी केली आहे किंवा खरेदी करत आहे, ते AI शी जोडलेले असतील तर ते महाग असतात. जर AI नसेल तर हे ड्रोन स्वार्म म्हणजेच झुंडीत वापरले जाऊ शकत नाही.

 

भारतीय कंपन्यांनीही आत्मघाती ड्रोन्सचे नमुने डिफेन्स एक्स्पोमध्ये दाखवले आहेत. मात्र यापैकी बहुतांश AI चा वापर करत नाही.

 

AI शी जोडलेले स्वार्मा ड्रोन्स कोणत्याही युद्धात वापरल्याचे पुरावे नाही, मात्र आत्माती ड्रोन्सचा वापर अनेकदा झाला आहे.

 

No comments:

Post a Comment