Total Pageviews

Thursday, 19 February 2015

मर्द आम्ही मराठे खरे, शत्रूला भरे कापरे|

मर्द आम्ही मराठे खरे, शत्रूला भरे कापरे| मर्द आम्ही मराठे खरे , शत्रूला भरे कापरे| देश रक्षाया, धर्म ताराया, कोण झुंजीत मागे सरे || धृ || वादळापरी आम्ही पुढेच चालतो , जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो | मराठा कधी न संगरातुनी हटे , मारुनी दहास एक मराठा कटे | सिंधु ओलांडुनी, धावतो संगिनी, पाय आता न मागे सरे || १ || व्हा पुढे अम्हा धनाजी ,बाजी सांगती, वीर हो उठा कडाडतात नौबती | विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी , पूर्वजापरी आम्ही अजिंक्य संगरी | घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी , मृत्यू अम्हा पुढे घाबरे || २ || भारता आम्ही तुलाच देव मानतो , हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो | राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा | ह्याच मातीवरी प्राण गेला तरी ,अमुची वीर गाथा उरे

No comments:

Post a Comment