Total Pageviews

Sunday, 14 October 2012

 More On Walking - The Easiest Way To Live Longer


 

Did you know that every minute you walk can extend your life by 1.5 to 2 minutes? In addition, many studies show that people who walk regularly live longer, weigh less, have lower blood pressure, and enjoy better overall health than non-walkers.
Here's a look at ten benefits of walking.

Walking Increases Your Lifespan

Walking more than an hour a day improves life expectancy significantly, a 2011 study showed. The researchers looked at 27,738 participants between the ages of 40 and 79 over a 13-year period. Surprisingly, their lifetime medical costs did not increase—even though they lived longer.
“An increase in walking time at the population level would bring about a tremendous change in people's health and medical cost,” the study authors wrote.

Walking Wards Off Diabetes

Just thirty minutes of walking a day can prevent diseases such as type 2 diabetes, a 2002 study looking at both overweight and average weight men and women in a population at high risk for the disease showed.
If you already have diabetes, walking is helpful for you, too. A mile or more daily cuts your risk of death from all causes in half, according to a 2007 study.

Walking Keeps Your Mind Sharp

Walking 72 blocks a week (around six to nine miles) helps increase grey matter, which in turn lowers the risk of suffering from cognitive impairment—or trouble with concentration, memory and thought, according to a study which looked at 299 seniors over a nine-year period.
Furthermore, walking five miles per week can provide some protection to the memory and learning areas of the brains of those already suffering from Alzheimer's disease or mild cognitive impairment, and lead to a slower decline in memory loss.

Walking Helps Lower Blood Pressure

Walking just 30 minutes a day, three to five days a week—even when the 30 minutes are broken into three ten-minute increments—has been found to significantly lower blood pressure.

Walking is Great for Bone Health

Putting one foot in front of the other for about a mile a day led to improved bone density in post-menopausal women, and slowed the rate of bone loss from the legs, according to a 1994 study. “It takes walkers four to seven years longer to reach the point of very low bone density, study leader Dr. Krall told the New York Times.

Walking Cuts the Risk of Stroke

Walking about 12.5 miles a week or more cut the risk of stroke in half, according to a study looking at over 11,000 Harvard University alumni with an average age of 58.

Walking Improves Your Mood

If you're feeling down in the dumps, walking is a quick and easy solution. Just thirty minutes on a treadmill reduces feelings of tension and depression, according to research published in the British Journal of Sports Medicine. In fact, the study found that walking lifted moods more quickly than anti-depressants did (and with fewer side effects).
And the more people walk, the better their mood and energy, says California State University Long Beach professor Robert Thayer, based on a study looking at 37 study participants over a 20-day period.

Walking Torches Calories

Just 20 minutes of walking a day will burn 7 pounds a year. The effects are even more dramatic when you add in some dietary changes as well.

Walking Improves Insomnia

Having trouble sleeping at night? Try taking a brisk 45-minute walk in the morning five days a week, and your sleep may improve significantly, according to research from the Fred Hutchinson Cancer Research Center in Seattle, which looked at women from the age of 50-74. (Walking in the evening, however, sometimes has the opposite effect—so keep an eye on when you're exercising and what your sleep patterns are.)

Walking is Good for the Heart

Women who took brisk walks for three or more hours per week reduced their risk of heart disease by 30-40 percent, according to an analysis of over 72,000 women aged 40-65, who were enrolled in the prospective Nurses' Health Study. As I reported recently, heart attacks kill more US women than men annually. However, the benefits of walking aren't limited to one gender. A different study showed that walking can cut the risk of coronary heart disease in half for men between the ages of 71 and 93.

   The sum of the whole is this ;
   Walk and be happy ; walk and be healthy,
   The best way to lengthen out our days is to walk steadily and with purpose.
   The wandering man knows of certain ancients, far gone in years, who have starved off infirmities and dissolution by earnest walking-hale fellows, close upon ninety, but brisk as boys.
            ------Charles Dickens

Saturday, 13 October 2012

मारेकर्‍यांचे उदात्तीकरण- तरुण भारतजन. अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणार्‍या मारेकर्‍यांचा सतत निषेध आणि निषेधच झाला पाहिजे. मात्र, काही मंडळी संकुचित अस्मितांना फुंकर घालत या मारेकर्‍यांचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रयत्नांना शत्रूची फूस आहे. हे उदात्तीकरण धोकादायक आहे. मानवतेला आणि देशभक्तीला कलंक लावणारे आहे. दहशतवादाच्या अशा उदात्तीकरणाचा सतत निषेधच केला पाहिजे.
संकुचित अस्मिता जेव्हा राष्ट्रीय अस्मितेपेक्षा मोठ्या बनतात, तेव्हा तिथे देशद्रोहाचा नंगा नाच सुरू होत असतो. पंथनिष्ठा, भाषाप्रेम, जात्याभिमान या गोष्टी कधीही देशप्रेमापेक्षा मोठ्या होता कामा नयेत. मात्र, कधी कधी या संकुचित अस्मितांचे भस्मासुर नकळत उभे रहात असतात. खलिस्तानचे भूत हे या देशातील राजकीय स्वार्थापोटी उभ्या केलेल्या भस्मासुरांमुळे उभे राहिलेले होते. हिंदुस्थान हा देश विविध भाषा, प्रांत, जाती, प्रार्थनापद्धती यांच्या विविधतेतून एकात्म जीवनदर्शन देणारा देश आहे. एकमेकांत बेमालूम मिसळणार्‍या रंगातून जसे इंद्रधनुष्य उभे राहते, त्याप्रमाणे भारतीय जीवनदर्शन जगाला आकर्षित करणारे आहे. विविधतेच्या तळाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णन केल्याप्रमाणे सखोल सांस्कृतिक एकात्मतेचा प्रवाह वाहत असतो. कधी तो गुरुवाणीतील नामदेवांच्या अभंगातून दिसतो, तर कधी आपण हिंदूच असल्याचे सत्य न्यायालयात उद्घोषित करणार्‍या जैन आचार्यांच्या आचार्यवाणीतून प्रकट होत असतो. या अंगभूत समरसतेला आव्हान देत स्वार्थासाठी संकुचित अस्मितांचे इमले काही लोक जेव्हा उभे करतात, तेव्हा ते क्षणभर आकाशाला स्पर्श करत असल्याचा भास तयार होतो. मात्र, हे इमले नंतर या समाजात अंगभूत समरसतेच्या प्रभावाने पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतात. खलिस्तानच्या देशदोही दहशतवादाचा अंत अशाच प्रकारे पाहता पाहता झाला. भारतातील राजकीय स्वार्थाने पुष्ट केलेल्या भस्मासुराचे रूप म्हणजे जर्नेलसिंग भिंद्रानवाले होते. या भिंद्रानवालेच्या संकुचित अस्मितेच्या दुष्ट देशद्रोहाला सीमापार पाकिस्तानी सत्तेतून जेव्हा वारा घातला गेला, तेव्हा देशद्रोहाचा अंगार पंजाबमध्ये फुलला होता. कितीतरी निरपराध लोकांचे बळी या दहशतवादाने Top of Form 1
&&&&&&& घेतले. मात्र, खलिस्तानच्या या दहशतवादी कारवायांना पंजाबमधील सर्वसामान्य माणसाने कधीच पाठिंबा दिला नाही. शीख पंथ ही जरी एक प्रार्थनापद्धती असली, तरी त्याच्या मुळाशी हिंदू धर्मातील जीवनमूल्ये आणि संस्कारांचा भक्कम पाया आहे. यवनी आक्रमणांच्या काळात क्षात्रवृत्तीला उत्तेजन देण्यासाठी हा पंथ सुरू झाला. या विचाराला खालसाचे रूप देताना गुरू गोविंदसिंग यांनीसवा लाख से एक लडाऊ, तैं गुरू गोविंद कहलाऊँअसे म्हणत एकेक सैनिक म्हणजे एक फौज अशी ताकद उभी केली. फत्तेसिंह आणि जोरावरसिंह यांनी धर्मासाठी कसे बलिदान केले जाते, त्याचे सर्वोच्च उदाहरण जगापुढे आपल्या पवित्र बलिदानाने प्रस्तुत केले. हा बलिदानाचा, धर्माभिमानाचा तेजस्वी इतिहास विसरून खलिस्तानवादी फुटीर आणि देशद्रोही आंदोलनाचा वणवा पेटविला गेला. कधीही पंजाबमधील शीख बांधवांनी या फुटीर आंदोलनाला मनापासून पाठिंबा दिला नाही. धार्मिक, आध्यात्मिक पवित्र भावनेचा दुरुपयोग करत आणि आध्यात्मिक आणि पवित्र जागेचा दुरुपयोग करत महादेवाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाप्रमाणे अमृतसरच्या सुवर्णमंदिराचा दुरुपयोग भिंद्रानवाले आणि दहशतवादी करू लागले होते. देशातील बहुसंख्य लोकांच्या, पंजाबमधील लोकांच्या भावनेच्या विरोधात हिंसेचे आणि दहशतवादाचे थैमान पंजाबमध्ये आणि भारतात या लोकांनी तयार केले होते. मात्र, पंंजाबमधील सामान्य माणूस या दहशतवादाच्या मानवताविरोधी काळ्या कृत्याच्या बाजूने कधीच नव्हता. याचा अंदाज घेऊन इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारची आखणी केली. ले. जनरल के. एस. ब्रार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो सैनिकांनी आपले बलिदान देत सुवर्णमंदिराचे पावित्र्य भंग न होऊ देता या पवित्र धार्मिक स्थानाच्या आडून मानवतेचा खून पाडणार्‍या, आध्यात्मिक मूल्यांना हरताळ फासणार्‍या, गुरुबाणीला भ्रष्ट करणार्‍या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या दहशतवादी भस्मासुराचा अंत झाल्यावर पंजाबधूनच काय, संपूर्ण देशातून कोठूनही नापसंतीची एक रेषाही उमटली नव्हती. सहजधारी आणि केशधारी अर्थात शीख आणि शिखेतर हिंंदू यांच्यात भावाभावाचे नाते आहे, दोघांच्याही धमण्यांमध्ये वाहणारे रक्त एकच आहे. दोघांच्या हृदयाच्या स्पंदनांचा ताल एकच आहे. दोघांचेही मायभूमीवर प्राणापलीकडे प्रेम आहे, हे या घटनाक्रमाने सिद्धच केले होते. मात्र, या देशातील बांधवांमध्ये द्वेषाचा आणि संघर्षाचा भडका उडवूनच आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजणे शक्य आहे, असे ज्यांना वाटत होते, अशा लोकांनी मूठभर लोकांच्या संकुचित अस्मितांना फुंकर घालून त्यांच्या हातून इंदिराजींची दुर्दैवी हत्या, अरुणकुमार वैद्य यांची हत्या अशी भ्याड कृत्ये करायला लावली. देशातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेने आपल्या मतदानातून आपल्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारा कायदा, सरकार आणि व्यवस्था निर्माण केलेल्या असतात त्यांना काही लोक जेव्हा आपल्या स्वार्थाकरिता परकीय शक्तीचे साहाय्य घेऊन आव्हान देतात, तेव्हा त्यांना दहशतवादी असे म्हटले जात असते. अशा दहशतवादाला संपविण्यातच खरी देशभक्ती असते. अरुणकुमार वैद्य आणि लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांच्यासारख्या बहादूर लष्करी अधिकार्‍यांनी हा दहशतवाद संपविण्यासाठी आपल्या सैनिकांसोबत तळहातावर शिर घेऊन काम केले होते. अशा देशभक्त लष्करी अधिकार्‍यांवर हल्ला करणारे कधीही देशाचे, मानवतेचे, अहिंसेचे, शांततेचे शत्रूच असतात. या असल्या राक्षसांचे कोणत्याही प्रकारे उदात्तीकरण होता कामा नये. सर्वसामान्यांच्या हिताकरिता कितीही मोठ्या सत्तेच्या विरोधात जे टक्कर देतात, ते क्रांतिकारक असतात. त्यांची दहशतवाद्याशी तुलनाही होऊ शकत नाही.
सुवर्णमंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व करणारे ले. जन. ब्रार काय किंवा जनरल अरुणकुमार वैद्य काय, त्यांचा या ऑपरेशनमध्ये वैयक्तिक स्वार्थ काहीही नव्हता. मातृभूमीच्या विरोधात, या देशातील समाजपुरुषांचा द्रोह करत, धार्मिक भावनांचा दुरुपयोग करत ज्या शक्ती कार्यरत होत्या, ज्यांचा देशाला आणि समाजाला धोका होता त्यांचा खात्मा करण्यासाठी जिवाची बाजी लावून या भूमिपुत्रांनी अतुलनीय धैर्य, संयम आणि पराक्रमाचे दर्शन देत हे ऑपरेशन यशस्वी केले होते. जन. अरुणकुमार वैद्य यांची हत्या करणार्‍या मारेकर्‍यांचा सतत निषेध आणि निषेधच झाला पाहिजे. मात्र, काही मंडळी संकुचित अस्मितांना फुंकर घालत या मारेकर्‍यांचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रयत्नांना शत्रूची फूस आहे. हे उदात्तीकरण धोकादायक आहे. मानवतेला आणि देशभक्तीला कलंक लावणारे आहे. दहशतवादाच्या अशा उदात्तीकरणाचा सतत निषेधच केला पाहिजे. जर्नेलसिंग भिंद्रानवाले आणि त्यांच्या अनुयायांनी जसे सुवर्णमंंदिराचा आणि आध्यात्मिक भावनेचा दहशतवादासाठी दुरुपयोग केला, तसाच दुरुपयोग आता शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीची मंडळी त्यांना मिळालेल्या विशेषाधिकाराचा दुरुपयोग करत या देशद्रोह्यांचे आणि मानवतेच्या मारेकर्‍यांचे उदात्तीकरण करण्याच्या मागे लागले आहेत. आपल्या देशासाठी लढणार्‍या अरुणकुमार वैद्य यांच्यासारख्या सेनापतींच्या मारेकर्‍यांचे उदात्तीकरण म्हणजे थेट देशद्रोह आहे. असल्या देशद्रोहाचा तीव्र विरोध केला पाहिजे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सगळा देश इंदिरा गांधींचे चिरंजीव राजीव गांधींच्या मागे उभा राहिला होता. आता इंदिरा गांधींच्या किंवा जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या मारेकर्‍यांचे कोणत्याही प्रकारे उदात्तीकरण होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे
 
रात्र वैर्‍याची आहे
रात्र वैर्‍याची आहे...तरुण भारत
देशाला अतिरेकी कारवायांचा धोका नसल्याचा निर्वाळा पंतप्रधान आणि गृहमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी वारंवार देत असतात. संपूर्ण देशभर कडेकोट सुरक्षाव्यवस्था असल्याचा निर्वाळा दिला जातो. पण, जोपर्यंत अतिरेकी आपली सुरक्षाव्यवस्था भेदत नाही तोपर्यंतच आपली सुरक्षाव्यवस्था अभेद्य असते! एखादी अतिरेकी घटना घडली की, हायअलर्टचा इशारा दिला जातो. हे हायअलर्ट कधी सुरू होते आणि कधी संपते, ते कुणालाच काय, पण पोलिसांनाही कळत नाही! दुसर्‍या वेळी पुन्हा अतिरेकी हल्ला झाला की, पुन्हा हायअलर्ट दिला जातो.
राजधानी दिल्ली आणि बिहारमधील बोधगया येथे घातपात घडवण्याचे इंडियन मुजाहिदीनच्या कुख्यात अतिरेक्यांचे मनसुबे, दिल्ली पोलिसांनी, त्यांच्या तीन अतिरेक्यांना अटक करत धुळीस मिळवले आहेत. दिल्ली पोलिसांनी दक्षिण दिल्लीतील पूल प्रल्हादपूर भागातील एका गुप्त अड्ड्यातून असद खान आणि इम्रान खान या दोन अतिरेक्यांना अटक केली, तर सईद फिरोज याला निझामुद्दिन रेल्वेस्थानकावर पकडण्यात आले. या अतिरेक्यांजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला. १ ऑगस्टला पुण्यात झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटात या तीन अतिरेक्यांचा सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत. या तीन अतिरेक्यांचे धागेदोरे मोठ्या अतिरेक्यांशी जुळलेले आहेत. मूळ बीडचा रहिवासी असलेला फय्याज अहमद कागझी हा लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आहे. सध्या त्याचे वास्तव्य एका पश्‍चिम आशियाई देशात आहे. पाकिस्तानस्थित इंडियन मुजाहिदीनच्या रियाझ भटकल आणि इक्बाल भटकल या दोघांशी समन्वय साधत, राजधानी दिल्लीसह भारतातील प्रमुख शहरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट कागझीने रचला होता. दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला अबु जिंदाल उर्फ सईद झबिउद्दिनच्या चौकशीतून ही बाब पुढे आली आणि दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करत या तीन अतिरेक्यांच्या मुसक्या बांधल्या आणि मोठा अनर्थ टळला.
दसरा आणि दिवाळीच्या काळात राजधानीत बॉम्बस्फोट घडवून देशात दहशत पसरवण्याचे, तर बोधगया येथे बॉम्बस्फोट घडवून धार्मिक तणाव निर्माण करण्याचे या अतिरेक्यांचे मनसुबे होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी ते हाणून पाडले, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे पकडण्यात आलेल्या तीन अतिरेक्यांपैकी दोघे महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नांदेड येथील रहिवासी होते. याचाच अर्थ, आजही महाराष्ट्रात अतिरेक्यांची पाळंमुळं खोलवर रुजली आहेत. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातच बॉम्बस्फोट घडवण्याची हिंमत या अतिरेक्यांनी दाखवली, ही बाब महाराष्ट्र पोलिसांच्या दृष्टीने लाजिरवाणी म्हणावी लागेल. न पकडण्यात आलेले आणखी किती अतिरेकी महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत आणि आपल्या कारवाया करत आहेत, असा प्रश्‍न यातून उपस्थित होतो.
८ जून २०१२ ला पुण्याच्या येरवडा कारागृहात असलेला इंडियन मुजाहिदीनचा कुख्यात अतिरेकी कातील सिद्दिकीची तुरुंगातच हत्या करण्यात आली होती. येरवडा तुरुंगात असलेले शरद मोहोळ आणि अशोक भालेराव या दोन कुख्यात गुन्हेगारांनी कातील सिद्दिकीची हत्या केली होती. सिद्दिकीच्या हत्येमुळे येरवडा तुरुंगाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. देशविरोधी कारवाया केल्यामुळे आम्ही कातील सिद्दिकीची हत्या केल्याचा दावा शरद मोहोळ आणि अशोक भालेराव यांच्याकडून करण्यात आला होता. या प्रकारे कातील सिद्दिकीच्या हत्येच्या आपल्या गुन्ह्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न या दोघांकडून करण्यात आला. कातील सिद्दिकीने अतिरेकी कारवाया केल्या असल्या आणि त्यामुळे तो देशाचा गुन्हेगार असला, तरी हत्या करून त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा करण्याचा अधिकार या दोन गुन्हेगारांना कुणी दिला होता, असा प्रश्‍न यातून उपस्थित होतो. कातील सिद्दिकी कुख्यात अतिरेकी असला, तरी त्याला त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर जन्मठेपेची वा फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार हा न्यायव्यवस्थेचा आहे. न्यायव्यवस्थेच्या या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा अधिकार देशात कुणालाच नाही, मोहोळ आणि भालेरावसारख्या कुख्यात गुन्हेगारांना तर निश्‍चितच नाही. कातीलच्या या हत्येची चौकशी करण्याचे तसेच या हत्येमागे काही षडयंत्र आहे का, हे पाहण्याचे निर्देश राज्य शासनाने या प्रकरणी दिले होते. मात्र, पुढे या चौकशीचे काय झाले, ते समजू शकले नाही. कातील सिद्दिकीच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच येरवडा तुरुंगात आणि पुणे न्यायालयाच्या परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट इंडियन मुजाहिदीनने रचला होता. मात्र, काही कारणाने तो रद्द करण्यात आला. त्यानंतर शरद मोहोळ आणि अशोक भालेराव यांच्या नातलगांची हत्या करण्याचे षडयंत्र या अतिरेक्यांनी रचले होते. मात्र, तेही सोडून देण्यात आले. त्यामुळे नंतर पुणे, मुंबई आणि दिल्ली येथे बॉम्बस्फोट घडवण्याचा कट या अतिरेक्यांनी रचला होता. त्यानुसार १ ऑगस्टला पुण्यात त्यांनी तीन बॉम्बस्फोट घडवले होेते. सुदैवाने यात फारशी प्राणहानी झाली नाही.
या तीन अतिरेक्यांच्या अटकेमुळे राजधानी दिल्ली आणि अन्यत्र बॉम्बस्फोट घडवण्याचा कट फसला असला, तरी देशाला असलेला अतिरेकी कारवायांचा धोका पूर्णपणे टळलेला नाही वा कमीही झालेला नाही, उलट तो जास्त वाढला आहे. या तीन अतिरेक्यांच्या अटकेमुळे देशभर आजही अतिरेक्यांच्या कारवाया सुखेनैव सुरू असल्याचे दिसून येत आहे. देशाला अतिरेकी कारवायांचा धोका नसल्याचा निर्वाळा पंतप्रधान आणि गृहमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी वारंवार देत असतात. संपूर्ण देशभर कडेकोट सुरक्षाव्यवस्था असल्याचा निर्वाळा दिला जातो. पण, जोपर्यंत अतिरेकी आपली सुरक्षाव्यवस्था भेदत नाही तोपर्यंतच आपली सुरक्षाव्यवस्था अभेद्य असते! एखादी अतिरेकी घटना घडली की, हायअलर्टचा इशारा दिला जातो. हे हायअलर्ट कधी सुरू होते आणि कधी संपते, ते कुणालाच काय, पण पोलिसांनाही कळत नाही! दुसर्‍या वेळी पुन्हा अतिरेकी हल्ला झाला की, पुन्हा हायअलर्ट दिला जातो. मुळात आमच्या देशातील सुरक्षायंत्रणा सदोष आणि दिखाऊ स्वरूपाची आहे. सुरक्षायंत्रणा आक्रमक राहण्याऐवजी नेहमीच बचावात्मक पवित्र्यात असते. याला सुरक्षायंत्रणेचे तसेच राजकीय नेतृत्वही जबाबदार आहे. देशात अतिरेकी खुलेआम राहत असताना, आमच्या गुप्तचर आणि पोलिस यंत्रणेला त्यांची चाहूल का लागत नाही? देशात छुप्या स्वरूपात कोणत्या अतिरेकी आणि गुन्हेगारी कारवाया सुरू आहेत, याची चाचपणी करण्याचे काम गुप्तचर यंत्रणांचे असते. त्यामुळे औरंगाबाद आणि नांदेड येथे इंडियन मुजाहिदीनचे अतिरेकी सदनिका घेऊन राहत असताना त्याची चाहूल गुप्तचर यंत्रणेला का लागू शकत नाही, हा प्रश्‍न आहे. याला गुप्तचर आणि पोलिस यंत्रणेचे अपयश म्हणायचे का? या अतिरेक्यांजवळून मोठ्या प्रमाणात बॉम्ब बनवण्याचे साहित्य, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा सापडला. हे साहित्य त्यांनी कुठून आणि कसे गोळा केले, याचेही उत्तर मिळाले पाहिजे.
भारतात घातपाती कारवाया घडवण्यासाठी अतिरेकी बाहेर देशातून येत असले, तरी आतील लोकांचे सहकार्य असल्याशिवाय ते कोणतेच काम वा अतिरेकी कारवायाही करू शकत नाहीत. असद आणि इम्रानची दिल्लीतील पूल प्रल्हादपूर भागात राहण्याची व्यवस्था करणारा राजूभाई नावाचा स्थानिक अतिरेकीच होता, याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही.
या तिघा अतिरेक्यांच्या अटकेने घातपाती कारवाया टळल्या असल्या, तरी सुरक्षायंत्रणेला गाफील राहता येणार नाही. कारण, या तीन अतिरेक्यांना अटक झाली असली तरी बाहेर असलेले त्यांचे साथीदार चूप बसतील, असे वाटत नाही. ते घातपाती कारवाया घडवून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. देशात अस्थिरता आणि दहशत निर्माण करण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न असल्यामुळे सुरक्षायंत्रणेवरची जबाबदारी वाढली आहे. ‘राजा जागा राहा, कारण रात्र वैर्‍याची आहे,’ असे देशातील सुरक्षायंत्रणेला सांगावे लागणार आहे.