SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Wednesday, 27 November 2019
Saturday, 23 November 2019
Wednesday, 20 November 2019
जेएनयूमधील आंदोलन कुणाविरुद्ध? TARUN BHARAT-:19-Nov-2019
कन्हैयाकुमार, उमर खालिद, शहेला रशिद आदी डाव्या विचारांच्या युवा नेत्यांच्या देशविरोधी कृत्यांमुळे गाजलेले दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) पुन्हा एकदा गेल्या आठवड्यांत विद्यार्थ्यांच्या झालेल्या तथ्यहीन आंदोलनामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. त्यावेळी ‘भारत तेरे टुकडे होंगे, इन्शा अल्ला, इन्शा अल्ला’, ‘हमे चाहिये आजादी’ या नार्यांनी गाजलेले आंदोलन यंदा संघ परिवारातील संस्थांवरील आगपाखडीमुळे गाजत आहे. या आंदोलनात उडी घेणार्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरातील अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण केले आणि पुतळ्याभोवती अश्लील वाक्ये आणि स्लोगन्स लिहून राष्ट्रवादी विचारधारेला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्कवाढ नको होती की त्यांना िंहदुत्व विचाराधारेला विरोध करायचा होता, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
खाणावळ आणि वसतिगृह शुल्क वाढीवरून विद्यार्थ्यांच्या निषेधाला प्रारंभ झाला. जेएनयूच्या परंपरागत आंदोलनानुसार प्राध्यापक, विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि मनुष्यबळ विकास मंत्र्यांना घेराव घालून त्यांची कोंडी करण्यात आली. विद्यापीठाच्या िंभती ‘भगवा हो बर्बाद, भाजपा हो बर्बाद’ आणि इतरही असभ्य घोषणांनी रंगवण्यात आल्या. ज्याचा समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात निषेध झाला. एका प्राध्यापिकेला घेराव घालून तिचे कपडे फाडण्याची निर्लज्ज कृती आंदोलनात सहभागी विद्यार्थिनींनी केली. आंदोलनाचे एकंदरीत उग्र आणि िंहसक रूप पाहून जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांच्या नावाने त्यांचे नोकरी करणारे मित्र, नातेवाईक की डाव्या पक्षाचे कार्यकर्ते राहतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण विद्यार्थी कुठले का असेना, ते विवेकानंदांच्या पुतळ्याची विटंबना करूच शकत नाहीत. असो. एकीकडे डाव्या संघटनेचे समर्थक होहल्ला करीत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ज्या पुतळ्याची विटंबना झाली त्याची स्वच्छता केली, त्या चबुतर्यावर पणत्या लावल्या आणि या राष्ट्रपुरुषाबद्दलच्या त्यांच्या भावना कृतीतून व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने शुल्कवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले आहे; पण खरा प्रश्न उपस्थित होतो की खरोखरीच विद्यापीठाने केलेली शुल्कवाढ इतके मोठे िंहसक आंदोलन उभारण्याएवढी होती का? कारण या आंदोलनामुळे विद्यापीठासमोरच्या रस्त्यावरील वाहतूक दिवसभर खोळंबली होती आणि त्याचा मोठा फटका दिल्लीकरांना बसला.
जेएनयूमध्ये शिक्षण घेणार्या विद्याथ्यार्र्ंना मिळणार्या अव्वाच्या सव्वा सवलतींबद्दल नेहेमीच देशभरात चर्चा असते. जिथे साध्या नर्सरीच्या विद्याथ्यार्र्ला महिन्याकाठी हजारो रुपये भरावे लागतात तेथे या विद्यापीठात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना अत्यल्प पैसा भरावा लागतो. जेएनयूमधून मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकारी बाहेर पडतात, सनदी अधिकारी निर्माण करणारे हे देशातील आघाडीचे विद्यापीठ आहे, असे सांगितले जाते. मग अशा विद्याथ्यार्र्ंना इतक्या मोठ्या प्रमाणात सवलती का? आणि येथून शिक्षण पूर्ण करून निघणारे विद्यार्थी प्रामाणिकतेचे पुतळे असतील तर प्रशासनामध्ये होणारे मोठे भ्रष्टाचार काय दर्शवितात? जेएनयूमध्ये वरचेवर होणारी आंदोलने आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणार्या शैक्षणिक नुकसानाबद्दल कुणीच काही बोलताना दिसत नाही. खरे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आणि देश-विदेशातील स्वतंत्र विचारांच्या आदान-प्रदानासाठी हे विद्यापीठ ओळखले जाते; पण येथील विद्यार्थी निरनिराळ्या आंदोलनांद्वारे प्रत्येकवेळी प्रशासनाला आणि शैक्षणिक वातावरणाला वेठीस का धरतात, हे न उलगडणारे कोडे आहे.
शाळेत जाणार्या िंकवा शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याला आपली शैक्षणिक कामगिरी स्वच्छ रहावी आणि त्यावर कुठलाही धब्बा येऊ नये, अशी मनोमन इच्छा असते. कारण हा शैक्षणिक धब्बा आपल्याला पुढच्या शिक्षणापासून अथवा नोकरीपासून वंचित ठेवू शकतो, अशी भीती त्याला वाटत असते; पण जेएनयूमधील विद्यार्थ्यांना अशी कुठलीच भीती वाटत नाही. येथे तिशी आणि पस्तीशी ओलांडलेले विद्यार्थी बघायला मिळणे, यात काहीच नावीन्य नाही. आल्या गेल्या सर्वच आंदोलनांमध्ये भाग घेणे, प्रशासनाला वेठीस धरणे आणि स्वतःसोबतच इतर विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान करून घेणे, हे येथे नित्याचेच झाले आहे.
ज्या शुल्कवाढीविरुद्ध आंदोलनाचा एवढा भडका उडाला, त्याकडे लक्ष टाकले असता शुल्कवाढ नगण्य असल्याचे लक्षात येते. प्रशासनाने वसतिगृहातील एका खोलीसाठी एका व्यक्तीसाठी आकारले जाणारे भाडे 20 रुपयांहून 600 रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. आता शुल्कवाढ कमी केल्याने विद्यार्थ्यांना त्यासाठी 200 रुपये आकारले जातील. एका खोलीत दोन जण राहात असल्यास त्यासाठी आकारल्या जाणार्या शुल्कात 10 रुपयांहून 300 रुपये आकारण्याचा निर्णय झाला होता; पण आता त्या शुल्कात घट करण्यात आली असून त्यासाठी 100 रुपये आकारले जातील.
वर्षभराच्या मेससाठी (खाणावळ) 12 हजार रुपयांपर्यंत वाढ सूचवण्यात आली होती. ती कमी करून आता प्रति विद्यार्थी 5,500 रुपये आकारले जाणार असून, त्यावर 1,700 रुपये सेवा कर आकारला जाणार आहे. येथील खोल्यांमध्ये थंडीच्या दिवसात दिवसभर हीटर वापरले जातात आणि त्यासाठी विजेचा शून्य खर्च त्यांना येत असे. वाढीव शुल्कानुसार प्रत्यक्ष हीटरसाठी जे बिल येईल, ते देण्याची तरतूद करण्यात आली होती; पण आता त्यात कटौती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मोठ्या प्रमाणात गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात, ही वस्तुस्थिती असली तरी या विद्यापीठाव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणार्या कुठल्याही विद्यार्थ्याला इतके कमी शुल्क आकारले जात नाही. राजधानी दिल्लीतील शिक्षण तर इतके महाग आहे, की जेएनयूइतके कमी शुल्क आकारणारी एकही खाजगी संस्था येथे शोधूनही सापडणे शक्य नाही. 2017-18 च्या अहवालानुसार या विद्यापीठाची वार्षिक आय 382 कोटी तर वार्षिक खर्च 556.62 कोटी आहे. या परिस्थितीत जमा-खर्चाचे गणित जमविण्यासाठी विद्यापीठाला काय कसरत करावी लागत असेल हे देवच जाणे.
या सार्या गोंधळाची दखल घेत भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी तर या विद्यापीठाला किमान दोन वर्षे टाळेच लावण्याची मागणी केली. विद्यापीठाला टाळे लावावे आणि येथील वसतिगृहांमध्ये स्वच्छता अभियान राबवावे, अशी त्यांची मागणी आहे. सारे काही सुरळीत झाल्यानंतर प्रवेश घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून ‘यापुढे गोंधळ करणार नाही’ असे प्रतिज्ञापत्र घेऊनच त्याला प्रवेश दिला जावा. असे केले तरच या विद्यापीठात शांतता नांदून विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासाकडे लक्ष देणे शक्य आहे, असे त्यांचे मत आहे. तिशी-पस्तीशीतील विद्यार्थ्यांचा या विद्यापीठात प्रवेश घेण्यामागचा आटापिटा का? याची कारणेही शोधली जायला हवी.
जेएनयू वर्षानुवर्षांपासून डाव्या संघटनांच्या विचारांचा गड राहिलेला आहे. ज्यावेळी देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत असते, त्यावेळी या विद्यापीठातील आयसा (ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन) आणि एसएफआय (स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया) या विद्यार्थी संघटनांना व्यवस्थेविरुद्ध लढा देत असल्याचे दाखवावेच लागते. कुठल्या का कारणाने असो शासनाविरुद्ध लढा देत असल्याचेही त्यांना दाखवावे लागते. विद्यार्थ्यांच मसिहा आपणच कसे आहोत, अशी प्रतिमादेखील त्यांना निर्माण करावी लागते आणि आंदोलनास थोडेसे का असेना यश आले तर ते आपल्यामुळेच कसे सरकार विचार करण्यास बाध्य झाले, हेदेखील त्यांनाच दाखवावे लागते. या संघटनांचा भाजपा आणि त्यांच्या विचारधारेला असलेला टोकाचा विरोध या संघटनांची लोकप्रियता कमी करण्यात होत आहे, हे समजून घ्याला ही मंडळी तयारच नाहीत, ही शोकांतिकाच म्हणायला हवी. आयसा या संयटनेचा नक्षली नेते चारू मुजूमदार यांच्या विचारधारेवर विश्वास आहे. आज डाव्यांचे विचार संपूर्ण देशातून कमी होत चालला आहे. जाधवपूर, टिस, जेएनयू असा काही मूठभर संस्थांमध्ये प्रभाव दाखवणार्या डाव्यांच्या विद्यार्थी संघटनांना हे सत्य स्वीकारावेच लागणार आहे. प्रत्येक वेळी आंदोलनाचे झेंडे गाडणार्या या संघटनांना कोणत्या मुद्यावर सरकारशी पंगा घ्यायचा कुठे नको, याचा विचार करावाच लागणार आहे
Subscribe to:
Posts (Atom)