सिंदूर' हे नावच भावनिक आहे! ते केवळ कपाळावरचे कुंकू नाही, तर ते भारतीय स्त्रीच्या, सौभाग्याचे, घराच्या मांगल्याचे आणि पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात अनेक महिलांचे सिंदूर पुसले गेले. 'ऑपरेशन सिंदूर' हे त्या वेदनेचे, त्या संतापाचे आणि पुसल्या गेलेल्या प्रत्येक सिंदूरला न्याय देण्याच्या राष्ट्रीय संकल्पाचे नाव ठरले.भारताने 'ऑपरेशन सिंदूर'ने काय साध्य केले आणि भारताचा शस्त्रसंधीचा निर्णय योग्य होता का? यावर सखोल विश्लेषण करणार आहेत ब्रिगेडिअर हेमंत महाजन.
ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारतीय सैन्याने 9 दहशतवादी तळांवर अचानक आणि अचूक हल्ला करून दहशतवाद्यांचे मोठे नुकसान केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना 'अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टिम' च्या मदतीने यशस्वी रीत्या निष्फळ ठरवण्यात आले. भारताने केलेल्या पुढील प्रतिहल्ल्यामुळे पाकिस्तानच्या 11लष्करी विमानतळांवर प्रचंड नुकसान झाले. परिणामी, पाकिस्तानला भारताकडे युद्धविरामासाठी विनंती करावी लागली.
भारताने 'ऑपरेशन सिंदूर'ने काय साध्य केले आणि भारताचा शस्त्रसंधीचा निर्णय योग्य होता का? यावर सखोल विश्लेषण करणार आहेत ब्रिगेडिअर हेमंत महाजन.
आजच्या काळात तंत्रज्ञान महत्त्वाचे असले तरी, जमिनीवरचा अंतिम विजय हा फक्त आणि फक्त सैनिकांच्या शौर्यावर, धैर्यावर, धाडसावर आणि नेतृत्वावर अवलंबून असतो. 4 पॅरा स्पेशल फोर्सने 'ऑपरेशन महादेव'मध्ये हे सिद्ध केले की, आपले वीर काश्मीर वाचवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्यास तयार आहेत. 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत '4 पॅरा स्पेशल फोर्सेस'ने अखेरीस 28 जुलै रोजी पहलगामला हिंदू पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पहलगाममध्ये सांडलेल्या अश्रूंना अखेर न्याय मिळाला.

No comments:
Post a Comment