Pages

Friday, 12 September 2025

"ऑपरेशन सिंदूर" हे फक्त एक सैनिकी अभियान नव्हते. ते भारतीय सैनिकाच्या रक्ताने, त्यागाने आणि अटळ निष्ठेने लिहिलेला विजयाचा अध्याय होता.

 

कश्मीरच्या प्रत्येक दरीत, प्रत्येक डोंगरकड्यात भारतीय सैनिकाचे शौर्य कोरलेले आहे. भारताच्या सुरक्षेच्या लढाईत कश्मीर आणि पाकिस्तानच्या संदर्भात आपल्या सैन्याचे योगदान सर्वात तेजस्वी ठरते. 1947-48, 1965, 1971 आणि 1999 या युद्धांत भारतीय जवानांनी रक्तअर्पण करून तिरंगा अधिक बळकट केला. असंख्य बलिदानांतून कश्मीर आज भारतात सुरक्षित आहे.

पाकिस्तानने 1980 नंतर कश्मीरच्या भूमीत दहशतवाद पेरायचा प्रयत्न केला. प्रॉक्सी वॉर च्या ज्वाळा पेटवल्या. पण त्याला प्रत्युत्तर देणारा रणसूर भारतीय सैनिकाने नेहमीच उभारला. आपल्या धाडसी जवानांनी दहशतवाद्यांच्या रक्तरंजित खेळाची कणा मोडून टाकली. आज फक्त मोजके 30-40 दहशतवादी उरले आहेत, हे भारतीय सैन्याच्या ताकदीचे जिवंत उदाहरण आहे.

22
एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर या शौर्याची खरी झलक जगाने पाहिली. पाकिस्तानाला ठाऊक होतेभारत बदला नक्की घेईलपण केव्हा, कुठे आणि किती प्रचंडतेने? हे त्यांच्या कल्पनेच्या पलीकडील होते. हिमालयाच्या कड्यांवर, एलओसीच्या प्रत्येक तिणग्यात भारतीय सैन्याने प्रखर युद्ध छेडले.

भारतीय सैन्याने या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर *स्मॉल आर्म्स* जसे की स्नायपर्स, लाइट मशीनगन, मीडियम मशीनगन, मोर्टार्स, रॉकेट लॉन्चर्स आणि क्षेपणास्त्रे वापरली. त्याचबरोबर तोफखाना (आर्टिलरी) देखील मोठ्या प्रमाणावर कार्यरत केला. या हल्ल्यांत पाकिस्तानी सैन्याचे शेकडो बंकर उध्वस्त झाले, त्यांचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले, एलओसीलगत असलेले दहशतवाद्यांचे लाँचपॅड नष्ट करण्यात आले, दारूगोळ्याचे साठे उडवले गेले आणि त्यांच्या पुरवठा मार्गांवर निर्णायक प्रहार केले गेले.

शिवाय, स्पेशल फोर्सेसने नियंत्रण रेषेच्या पलीकडे तुलनेने लहान-लहान गटांमध्ये घुसखोरी करून अनेक लक्ष्यांवर हल्ले केले. परिणामी पूर्ण नियंत्रण रेषेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि पाकिस्तान गोंधळून गेला की भारताकडून मोठा जमिनीवरील हल्ला केव्हा आणि कुठे होईल

पाकिस्तानी सैन्याला प्रचंड तोटा सहन करावा लागला. त्यांच्या बंकर्स उद्ध्वस्त झाले, दहशतवाद्यांचे लाँचपॅड नष्ट झाले, दारूगोळ्याचे साठे उडवले आणि पुरवठा मार्ग कापून टाकले.

एलओसीवरील या तीव्र लढायांमध्ये पाकिस्तानचे सर्वाधिक नुकसान झाले. भारतीय सैन्याची लढाईची पद्धत अत्यंत परिणामकारक ठरली. कमी हानी सोसत भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला मोठा फटका दिला. या इतक्या जोरदार कारवाईमुळे अनेक ठिकाणी पाकिस्तानचे सैनिक एलओसी सोडून माघारी गेले. त्यानंतर पाकिस्तानने प्रतिहल्ला म्हणून पुंछ-राजवरी परिसरातील नागरी वसाहतींवर गोळीबार केला ज्यात काही भारतीय नागरिकांचा बळी गेला.

स्पेशल फोर्सेसच्या धाडसी मोहिमांनी पाकिस्तानच्या हृदयात भीतीचे वादळ निर्माण केले. एवढेच नव्हे तर पहिल्यांदा पाकिस्तान स्वतःच्या भूमीवरच असुरक्षित वाटू लागला. बलुचिस्तानात अडकलेले सैनिक तातडीने सीमेकडे परतावे लागलेभारताचा दबाव इतका जबरदस्त होता.

भारतीय जवानांनी अत्यल्प हानी सोसत पाकिस्तानला शेकडो जखमा दिल्या. रणांगणावरची त्यांची लढाई ही केवळ शस्त्रांचा वापर नव्हे, तर आत्मत्याग, धैर्य आणि मातृभूमीवरील अखंड निष्ठेचे दर्शन होते. इतकी तीव्रता होती की पाकिस्तानी सैनिक अनेक ठिकाणी एलओसी सोडून पळ काढू लागले.

त्या आधी पाकिस्तानचे सुमारे 50 टक्के सैन्य बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनवा येथे दहशतवादविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले होते. मात्र भारताच्या जमिनीवरील संभाव्य हल्ल्याच्या भीतीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर सीमेकडे सैन्य परत आणावे लागले, ज्यामुळे पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली

या भीतीमुळे पाकिस्तान आपली घाईगडबड सामान्य नागरिकांवर वळवू लागलापुंछ राजौरीमध्ये निरपराध भारतीय नागरिकांवर गोळीबार केला. तरीही भारतीय सैन्याचे मनोधैर्य क्षणभरही डगमगले नाही. ते सीमेवर ठाम उभे राहिलेदेशाच्या प्रत्येक घराचे रक्षण करत.

इतकी भीती निर्माण झाली होती की काही बातम्यांमध्ये पाकिस्तानच्या सैन्यप्रमुखाच्या पत्नीने देश सोडून इंग्लंडमध्ये आसरा घेतल्याचे वृत्त आले. हेच दर्शवते की भारतीय सैनिकाने पाकिस्तानच्या गाभ्यात भीतीची ठिणगी पेटवली होती.

या सर्व मोहिमेत भारताने केवळ लढाई केली नाही; तर रणनीती, आश्चर्य आणि सामरिक भ्रम निर्माण करून जगाला दाखवले की भारतीय सैन्यावर विश्वास ठेवणे म्हणजे मातृभूमी सुरक्षित ठेवणे. चौदा दिवसांनी केलेल्या क्षेपणास्त्र प्रहाराने या सर्व प्रयत्नांची सांगता विजयाच्या घोषाने झाली.


एलओसीवरील या सततच्या कारवायांमुळे भारताला सामरिक आश्चर्य धोकेबाजी (surprise and strategic deception) साधता आली. त्यामुळे चौदा दिवसांनंतर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रचंड यश मिळाले. "ऑपरेशन सिंदूर"मध्ये भारतीय सैन्याने नेहमीप्रमाणे अपार बलिदान शौर्य दाखवत विजय मिळवला.

पाकिस्तानबरोबर झालेल्या चारही मोठ्या युद्धांमध्ये भारतीय सैन्याने दाखवलेली पराक्रमाची गाथा संपूर्ण जगाला ठाऊक आहे. मात्र, मार्च २००० ते सप्टेंबर २०२५ या कालखंडात दहशतवादाच्या  आव्हानाचा सामना करताना भारतीय सैनिकांनी ज्या शौर्याची उदाहरणे घडवली, ती विस्मरणीय आहेत.

या कालावधीत १३,४२९ दहशतवाद्यांचा संहार करताना आपल्या राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ,६३० अधिकारी आणि जवानांनी प्राणांची आहुती दिली. हा त्याग भारतातील अन्य कुठल्याही सुरक्षा दलांच्या बलिदानापेक्षा कितीतरी पटीने महान आहे.

त्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब हा आजच्या आणि उद्याच्या सुरक्षित भारताचा पाया आहे. या शौर्यस्मरणातून आपल्याला केवळ सैन्याच्या त्यागाची , अढळ निष्ठेचीही जाणीव होते.

"ऑपरेशन सिंदूर" हे फक्त एक सैनिकी अभियान नव्हते. ते भारतीय सैनिकाच्या रक्ताने, त्यागाने आणि अटळ निष्ठेने लिहिलेला विजयाचा अध्याय होता. ज्या सैनिकांनी आपले जीवन दिले, त्यांच्यामुळे तिरंगा आजही सीमेवर अभिमानाने फडकत आहे.

No comments:

Post a Comment