Pages

Saturday, 21 November 2015

हा तर नीच घरभेद्या-UNPATRIOTIC INDIANS

हा तर नीच घरभेद्या vasudeo kulkarni Friday, November 20, 2015 AT 11:14 AM (IST) Tags: lolak1 भारतावर आक्रमण करणार्‍या मोगल आणि परकीयांना आमंत्रण देणारे घरभेदे राजे आणि त्यांचे सहकारी याच देशातले होते. या देशद्रोह्यांच्यामुळे मोगलांना भारतात आपले साम्राज्य प्रस्थापित करता आले. पुढे व्यापारासाठी आलेल्या ब्रिटिशांनाही याच मातीतल्या नालायक नराधमांनी मदत केली. व्यक्तिगत वैरातून घरभेदेपणा केला आणि ब्रिटिश राजवट भारतात आली. त्याच नीच, नालायक घरभेद्यांचा वारसा माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर पुढे चालवत आहेत, याची शरम काँग्रेस पक्षाला वाटायला हवी. प्रत्येक पक्षात राजकीय विदूषक आहेतच. काँग्रेस पक्षाने दिग्विजय सिंग आणि मणिशंकर अय्यर हे विदूषक पोसले आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेल्या वटवटीची गांभीर्याने दखल घ्यायची वेळ आली नव्हती. पण आता मात्र या विदुषकाला पक्षाने आवरले नाही, तर तो पक्षाला अधिकच खड्ड्यात घातल्याशिवाय नक्कीच राहणार नाही, अशी स्थिती आहे. कुठे आणि काय बोलावे, याचे तारतम्य अय्यर यांना राहिलेले नाही. ‘पाकिस्तान टी व्ही’ ला दिलेल्या मुलाखतीत अय्यर जे काही बरळले आहेत, तो घरभेदीपणाचाच प्रकार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरवरून निर्माण झालेला तंटा सोडवायसाठी काँग्रेस काय सांगेल? या निवेदिकाच्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘मोदींना हटवा आणि आम्हाला सत्तेत आणा.’ पाकिस्तानला मोदींना सत्तेवरून खाली खेचा, असे सांगत अय्यर यांनी नीचपणाचा कळस केला आहे. अय्यर यांचे अजब उत्तर ऐकून संभ्रमित झालेल्या निवेदकाने ‘हे तर तुम्हालाच करावे लागेल’ म्हणजेच मोदींना सत्तेवरून हटवायचे काम तुमचेच आहे, असे उत्तर दिले. भारतीय लोकशाहीत सर्वसामान्य जनता हीच सार्वभौम आहे, तिच्याच हाती देशाची सर्वोच्च सत्ता आहे, याचेही भान अय्यरांना राहिले नाही. पॅरिसमध्ये इस्लामी स्टेटने केलेल्या महाभयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी असेच भंपक व्यक्तव्य केले आहे. ‘पाश्‍चिमात्य देशात असलेला इस्लाम विरुद्धचा भयगंड त्वरित थांबायला हवा. फ्रान्समध्ये राहणार्‍या मुस्लिमांना ते या देशाचे नागरिक आहेत, अशी खात्री द्यायला हवी. मध्य आशियातील अमेरिकेचे धोरणही इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यामागचे कारण आहे, असे त्यांनी सांगितले आहे. अय्यर यांनी इस्लामी क्रूर दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करीत तथाकथित धर्मनिरपेक्षतावादाचा गजर केल्याचा आणलेला आव खरा नाही. त्यांनी केलेल्या या अति आचरट वक्तव्यामुळे भारतीय लोकशाही आणि सार्वभौम भारतीय जनतेचाही घोर अवमान झाला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची चमचेगिरी करतच अय्यर यांनी काँग्रेस पक्षात स्थान मिळवले. गांधी घराण्याचे ते लाडके असल्यानेच त्यांच्या बेलगाम सुटलेल्या जिभेला आवर घालायचे सामर्थ्य काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठात नाही. त्यामुळेच पिसाळलेल्या कुत्र्यासारखी अय्यर यांची स्थिती झाली आहे. यापूर्वीही केंद्रात मंत्री असताना त्यांनी अंदमानमधल्या शहिद स्वातंत्र्यसैनिकांचा घोर अपमान केला होता. अंदमानातल्या सेल्युलर तुरुंगाच्या आवारातल्या स्मारकावर स्वातंत्र्य-वीर विनायक दामोदर सावरकर यांचे कोरलेले नाव या हरामखोरांनी काढून टाकले आणि तेथे महात्मा गांधींचे नाव कोरले होते. महात्माजी अंदमानला कधीही गेले नव्हते. तर याच तुरुंगातल्या काळकोठडीत सावरकारांनी 11 वर्षे अनंत यातना सहन केल्या होत्या. याच तुरुंगात शेकडो स्वातंत्र्य सैनिक शहिद झाले. हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी देहदंड सोसला. पण, त्यांच्या त्यागाचाही याच अय्यर यांनी घोर अवमान केला होता. या पिसाळलेल्या कुत्र्याला काँग्रेसने त्याच्या गळ्यात पट्टा बांधून पिंजर्‍यात ठेवायला हवे. अन्यथा हा कुत्रा असाच भुंकत आणि चावत राहील.

No comments:

Post a Comment