Total Pageviews

Wednesday, 20 April 2011

INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 69

INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 69
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/
राजकारण्यांना
'खुष' ठेवण्यासाठी उद्योजकांचा 'निधी' - 'द डार्क साईड ऑफ ब्लॅक मनी' पुस्तकाचा गौप्यस्फोट

वाळू-
सरकारी धोरण प्रभावित करण्यासाठी वा आपल्या बाजूने निर्णय घेण्यासाठी देशातील बहुतेक मोठी उद्योग व व्यापारी घराणी खासदारांना खूष ठेवतात. महसूल गुप्तचर विभाग व अमली द्रव्य नियंत्रण विभागाचे माजी महासंचालक बी.व्ही. कुमार यांनी लिहिलेल्या 'द डार्क साईड ऑफ ब्लॅक मनी' या पुस्तकात हा गौप्यस्फोट केला आहे. काही मोठी उद्योग घराणी जोखिमेपासून स्वत:ला वाचविण्यासाठी विरोधी पक्ष खासदारांनादेखील आपल्या विरोधात एखादा मुद्दा आला तर तो हाणून पाडण्याच्या कामासाठी त्यांना खूश ठेवतात. सरकारचा कोणताही निर्णय आपल्या हिताचा असला पाहिजे असा या उद्योग घराण्यांचा प्रयत्न असतो. ही घराणी अशी 'आर्थिक गुंतवणूक' दीर्घकालीन गुंतवणूक मानतात. या घराण्यांकडून राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो. सन १९५८ च्या तुकडीचे आयआरएस (भारतीय महसूल सेवा) कुमार यांनी आपल्या ३५ वर्षांाय सेवा काळात अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. या पुस्तकात त्यांनी विरोधी पक्षांवरदेखील जोरदार प्रहार केला. राजकीय पक्ष भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा बनवत असले तरी बहुतेक राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही आपल्या खात्यांची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केलेली नाही. भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यास असे राजकीय नेते पक्ष बदलतात व विरोधी पक्षात सामील होतात. विरोधी पक्ष अशा नेत्यांचे केवळ स्वागतच करीत नाही तर त्यांना नायकाची (हिरो) वागणूक देतात. कोनार्क पब्लिशर्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. कुमार अमली द्रव्य नियंत्रण विभागाचे महासंचालक असताना त्यांच्याच कार्यकाळात तस्करी, अमली द्रव्याचा व्यापार, संघटित आर्थिक गुन्हेगारी यांचे विदेशातील धागेदोरे उघडकीस आणण्यात आले. बहुतेक सर्वच राजकीय पक्ष विरोधी पक्ष बाकावर असताना भ्रष्टाचार उघडकीस आणण्यात स्वारस्य दाखवतात. परंतु सरकार खाली खेचण्यात वा पाडण्यात यशस्वी झाल्यानंतर त्यांचा रस कमी होतो, असे कुमार यांनी या पुस्तकात लिहिले आहे. राजकीय नेत्यांसाठी भ्रष्टाचाराचा मुद्दा हा 'बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात 'असतो. ते आपल्या सोयीनुसार या मुद्याचा वापर करतात. या पुस्तकाला माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम.के.नारायणन यांची प्रस्तावना आहे. 'डार्क साईड ऑफ ब्लॅक मनी'चे योग्यवेळी प्रकाशन झाले आहे. प्रकाशनासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही असे नारायणन यांनी म्हटले आहे. बेकायदेशीर जमविलेला प्रचंड मोठा पैसा भारतातून 'करचोरीसाठी नंदनवन' समजल्या जाणाऱ्या देशांमध्ये जातो. त्यामुळे देशाच्या सरकारी तिजोरीचे फारमोठे नुकसान तर होतेच, सोबतच हा पैसा संघटित गुन्हेगारी, दहशतवादी संघटना, सरकार विरोधी कारवाया यासाठी राष्ट्रविरोधी शक्तींकडून वापरला जाण्याची भीती या पुस्तकात व्यक्त केली आहे. संपूर्ण जग इंटरनेटने जवळ आले असल्याने सीमा भागात चालणाऱ्या अवैध कारवाया रोखणे फार कठणी झाले आहे. वित्तीय ओघाच्या सूक्ष्म व अतिसूक्ष्म व्यवस्थापनामुळे हा व्यवसाय अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. कायदेशीरदृष्ट्या कोणता वित्तीय व्यवहार खरा व कोणता खोटा हे ठरविणे कठीण आहे. माजी स्वीस बँकर रुडोल्फ इल्मेर यांनी 'विकिलिक्स'चे संस्थापक व मालक ज्युलियन असांजे यांना जगातील करबुडव्या किमान २००० प्रमुख लोकांच्या बँक खात्यांची माहिती दिली. 'विकिलिक्स'ने त्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर या २००० लोकांमध्ये भारतातले कोण? यावर प्रसिद्धी व इलेक्ट्राॅनिक मीडियात जोरदार वादळ उठले. या लोकांच्या यादीत काही भारतीय नावांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विरोधी पक्षांनी हा मुद्दा डोक्यावर घेत केंद्रातील संपुआ सरकारला धारेवर धरले. विदेशातील काळ्या पैशाबाबत सरकार निष्क्रिय असल्याची जोरदार टीका विरोधी पक्षांनी केली ठेकेदाराकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक अहमदनगर, (20-April-2011) एकीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भ्रष्टाचाराविरुद्ध तुटून पडत असताना दुसरीकडे त्यांच्याच जिल्ह्यातील अधिकारी भल्यामोठ्या रकमेची लाच स्वीकारताना अडकत असल्याचे चित्र समोर आले आहे. उपजिल्हाधिकारी विकास पानसरे यांच्यानंतर आज (ता.१९) कर्जतचे प्रांताधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी माती खाल्ली. वाळू ठेकेदारावरील कारवाईतील मुद्देमाल सोडविण्यासाठी दोन लाखांची लाच स्वीकारताना त्यांना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. गायकवाड यांच्यासह त्यांच्या सरकारी वाहनावरील चालक भीमा प्रभू खामकर यालाही अटक करण्यात आली आहे. लाचलूपत प्रतिबंधक खात्याच्या या कारवाईने महसूल शाखेत एकच खळबळ उडाली. गायकवाड हे वर्ग- चे अधिकारी असल्याने त्यांच्या राहत्या घराची नगरच्या पथकाने कर्जतमध्ये झडती सुरू केली आहे. दौंड तालुक्यातील केडगाव येथील शरद सोपानराव सोडणवर यांनी कर्जत तालुक्यातील हिंगणी येथे वाळू ठेका घेतला होता. नदीतील वाळू काढण्यासाठी त्यांनी पोकलंड मशीनच्या साहाय्याने रस्ता तयार करताना प्रांताधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी गेल्या ३० मार्च रोजी छापा टाकून पोकलंड मशीनसह अन्य मुद्देमाल जप्त केला होता. या कारवाईपोटी गायकवाड यांनी ११ लाखांचा दंड सोडणवर यांना केला होता. ही कारवाई सौम्य करण्यासाठी आठ लाख रुपये देण्याचे निश्‍चित झाले. त्यापोटी पहिला हप्ता तीन लाख रुपये दंड दोन लाख रुपये लाच असे निश्‍चित झाले. गायकवाड यांनी सोडणवर यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्यानंतर त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.सोडणकर हे लाचेची रक्कम देण्यासाठी गेले असता, गायकवाड यांनी ती रक्कम त्यांच्या सरकारी जीपवर असलेले चालक खामकर याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार सोडणकर हे खामकर याला रक्कम देताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही रक्कम गायकवाड यांच्यासाठी स्वीकारली जात असल्याने खामकर यांच्यासह गायकवाड यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या छाप्यानंतर नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही पाचारण करण्यात येऊन गायकवाड यांच्या कर्जत येथील निवासस्थानी छापा टाकून त्यांच्या घराची झडती सुरू करण्यात आली आहे.  

No comments:

Post a Comment