Pages

Thursday, 21 April 2011

INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 72

INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 72
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/226 महिलांचे गर्भाशय, या रुग्णालयातल्या डॉक्टरनी शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले. केवळ पैशाच्या हव्यासापोटी
गेल्या काही वर्षात रुग्णसेवेपेक्षा, रुग्णाला-त्याच्या नातेवाईकाला लुबाडून आपले उखळ पांढरे करून घेणाऱ्या डॉक्टरांची संख्याही देशात वाढते आहे. केवळ पैसे मिळवायसाठीच राजस्थानातल्या दौसा जिल्ह्यातल्या तीन खाजगी रुग्णालयातल्या डॉक्सर्सनी आपण रुग्णांचे "रक्षक' नव्हे, तर "भक्षक' आहोत, हे आपल्या कृतीने सिध्द करून दाखवले आहे. राजस्थान राज्य सरकारने गरीब महिलांवर उपचार करायसाठी दौसा जिल्ह्यातल्या बांदीकुई शहरातल्या तीन खाजगी रुग्णालयांना "जननी सुरक्षा' योजनेस मान्यता दिली. गरीब महिला रुग्णांना प्रसुती आणि अन्य वैद्यकीय उपचाराच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, असा सरकारचा ही मान्यता देताना हेतू होता. प्रत्यक्षात मात्र या तिन्ही रुग्णालयांनी सरकारची मान्यता म्हणजे गरीब महिला रुग्णांना लुटायचा परवानाच समजून, महिला रुग्णांना फसवून लक्षावधी रुपयांची लुबाडणूक केल्याचे प्रकरण ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी बाहेर काढले आहे. या रुग्णालयात मार्च ते सप्टेंबर 2010 या सात महिन्यात उपचारासाठी 385 महिला दाखल झाल्या. त्यातल्या 226 महिलांचे गर्भाशय, या रुग्णालयातल्या डॉक्टरनी शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले. 20 ते 30 वयोगटातल्या या गरीब महिलांना या डॉक्टरनी "वांझ' बनवले ते, केवळ पैशाच्या हव्यासापोटी.माहिती अधिकाराद्वारे ग्राहक पंचायतीने या रुग्णालयातील गरीब महिलांवर झालेल्या उपचारांची माहिती मागवली होती. ती मिळाल्यावर ग्राहक पंचायतीच्या सदस्यांना, पैसा उकळायसाठी डॉक्टर्सनी केलेले हे अजब उपचार पाहून धक्का बसला. त्यांनी तातडीने राज्य सरकारकडे या प्रकरणाची तक्रार केली. सरकारने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर . पी. मिना यांच्या अध्यक्षते-खाली नेमलेल्या समितीने, या रुग्णालयांची चौकशीही सुरु केली. या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गरीब महिलांना डॉक्टर, तुम्हाला संक्रमणाचा रोग झाला आहे. तो शरीरात पसरेल. तसे झाल्यास तुमच्या जीविताला धोका आहे. तो टाळायचा असल्यास तातडीने गर्भाशय काढून टाकावा लागेल, असा वैद्यकीय सल्ला देत. महिला रुग्णांचे घाबरलेले आप्त-नातेवाईक त्या शस्त्रक्रियेला मान्यता देत. प्रत्येक रुग्णाकडून चौदा ते वीस हजार रुपये वसूल करून, या रुग्णालयाने गर्भाशय काढून टाकायचा कारखानाच सुरु केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. अवघ्या तीनच महिन्यांपूर्वी जोधपूरच्या सरकारी रुग्णालयात बनावट सलायन (ग्लुकोज) दिल्यामुळे पंधरा महिलांचे मृत्यू झाल्याचे प्रकरण अद्यापही गाजत असताना, खाजगी डॉक्टरांचा हा नवा उद्योग चव्हाट्यावर आला आहे.

No comments:

Post a Comment