Total Pageviews

Wednesday 8 June 2011

POLICE AUTROCITIES ,MINISTERS MLAs

निर्णयाचा फेरविचार करण्याचा सरकारला आदेश पोलीस डायरी'परिपत्रकावर हायकोर्टाचा दंडुका
. टा. प्रतिनिधी
एखाद्या प्रकरणात मंत्री किंवा आमदाराने पोलीस स्टेशनात फोन केला तर त्याची नोंद पोलीस डायरीत करण्याचे राज्य सरकारचे परिपत्रक अत्यंत विचित्र असून या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. बुधवारी या प्रकरणाच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने परिपत्रकावर ताशेरे ओढले.
मंत्री किंवा आमदार एखाद्या प्रकरणात हस्तक्षेप करून पोलीस स्टेशनात फोन करत असेल तर त्याची नोंद डायरीत करण्यापासून पोलिसांना का रोखावे, असा सवाल करत न्या. रंजना देसाई आर. व्ही. मोरे यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याचे आदेश सरकारला दिले. राज्य सरकारवर परिपत्रक रद्द करण्यास दबाव टाकता येत नसला तरीही सरकार या परिपत्रकाच्या निर्णयावर ठाम असेल तर या प्रकरणाचा मेरिटवर विचार करण्यात येईल, असेही हायकोर्टाने सुनावले. एका आमदाराच्या कुटुंबीयाच्या गुन्हे प्रकरणात केंदीय मंत्री विलासराव देशमुख यांनी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला होता. त्यावरून त्यांना दंडही ठोठावण्यात आला
कैद्याला पोलिसांकडून मारहाण
येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सात वर्षाची सजा भोगत असलेल्या छोटू उर्फ नितीन शंकर गोवर्धन या कैद्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात चार पोलिसांकडून बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर छोटूने जिल्हा कारागृहातच उपोषण सुरू केले. त्याच्या समर्थनार्थ 50 कैदीही उपोषणासाठी सरसावले. अखेर दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडून मिळाल्यानंतर छोटू त्याच्या सहकार्‍यांनी उपोषण मागे घेतले.
छोटू उर्फ नितीन गोवर्धन हा मागील साडे चार वर्षापासून 376, 366, 363 या कलमाखाली सात वर्षाची सजा येथील जिल्हा कारागृहात भोगत आहे. 4 जूनला त्याला रक्तदाबाचा त्रास सुरू झाल्याने कारागृह अधीक्षक टिकले यांनी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली. त्यानुसार पोलीस मुख्यालयाच्या चार शिपायांच्या बंदोबस्तात त्याला दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयातच पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप त्याच्या वडिलांकडून होत आहे. 5 जूनला त्याला टाटा सुमोतून चार पोलिसांसह नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 6 जूनला स्ट्रेचरवर टाकून पायांना बॅडेज बांधलेल्या अवस्थेत कारागृहात पोहचविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 6 वाजतापासून त्याने आमरण सुरू केले होते.
पोलिसांनी सुपारी घेतली- शंकर गोवर्धन
नितीन गोवर्धन याचे वडील शंकर गोवर्धन यांनी पोलिसांनी सुपारी घेऊन आपल्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात त्यांनी तसा स्पष्ट आरोप केला असून नागपूरहून उपचारानंतर चंद्रपूरला परत आणल्यावर रुग्णालयात ठेवता स्ट्रेचरने कारागृहातच आणण्यावर आक्षेप घेतला आहे

No comments:

Post a Comment