Total Pageviews

Wednesday 8 June 2011

NAXALS BURN VEHICLES TO STOP ROAD CONSTUCTION

धानोरा। दि. 8 (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील तोडे गावाकडे जाणार्‍या रस्ता कामावरील ट्रॅक्टर, डांबर बोझर व ट्रक या तीन वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. यात अंदाजे 50 लाखाचे नुकसान झाले आहे. सदर घटना आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास तोडे गावाजवळ घडली.
कन्हारटोला-तुकूम-तोडे या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम मागील काही दिवसापासून सुरू आहे. दरम्यान, आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास मजूर जेवन करीत असतांना 40 ते 50 संख्येत असलेल्या नक्षलवाद्यांनी घटनास्थळ गाठून एम. एच. 33/ एफ- 1524 क्रंमाकाचा ट्रॅक्टर व ट्राली, डांबरबोझर व एम. एच. 34/एम- 7405 क्रमांकाचा ट्रक जाळला.
यात तिन्ही वाहने जाळून खाक झाली आहे.
त्यामुळे अंदाजे 50 लाखाचे नुकसान झाले आहे. सदर काम लक्ष्मी कन्ट्रक्शन कंपनी राजुराच्यावतीने करण्यात येत असून जाळलेली तिन्ही वाहने त्यांच्या मालकीची आहे.
यापूर्वीही नक्षलवाद्यांनी काम बंद करण्याचे फर्मान सोडले होते. त्यामुळे काही दिवस काम बंद होते. नुकताच पुन्हा कंत्राटदारांनी कामाला सुरवात केली. मात्र आज कामावरील तीन वाहनांची नक्षलवाद्यानी जाळपोळ केल्याने काम रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. वृत लिहीर्पयत या प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली नव्हती.

No comments:

Post a Comment